Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

केपीआयटीतर्फे आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्नात वार्षिक पातळीवर ५१.७ टक्के वाढ. उत्पन्न आणि नफा कायम

पुणे  – NSE: KPITTECH BSE: 542651 – केपीआयटी टेक्नॉलॉजीज ही ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्रासाठी सॉफ्टवेयरवर आधारित वाहने प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करणारी स्वतंत्र सॉफ्टवेयर इंटिग्रेशन भागीदार कंपनी आहे. आज कंपनीने आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले.

कामगिरीचा आढावा

  • आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्न

o   वार्षिक पातळीवर सीसी उत्पन्न वाढ ५१ टक्के

o   डॉलर्समधील वाढ वार्षिक पातळीवर ४९ टक्के

o   धोरणात्मक खाती, मिडलवेयर आणि आर्किटेक्चर, इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आणि कनेक्टेड व्हिइकल्स यांमुळे विकास

  • आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीतील ईबीआयटीडीए आणि निव्वळ नफा

o   ईबीआयटीडीए २० टक्के, वार्षिक पातळीवर ६५.२ टक्के वाढ, तर तिमाही पातळीवर १३.३ टक्के वाढ

o   करोत्तर नफा वार्षिक पातळीवर ५६.९ टक्के

o   उत्पन्नातील वाढीमुळे ईबीआयटीडीए मार्जिनमध्ये तिमाहीत ९० बीपीएसचा विस्तार, यामुळे निश्चित खर्च आणि कामकाजातील कार्यक्षमतेत वाढ

  • आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत मिळवलेली नव्या कामाची टीव्हीसी १९० दशलक्ष डॉलर्स
  • कर्मचारी वर्ग

o   जागतिक कर्मचारी वर्ग ११५००.

o   आगामी कर्मचारी वर्गाचा दर्जा उंचावण्यावर जास्त भर, तांत्रिक व व्यवस्थापकीय नेतृत्वावर लक्ष केंद्रित करणार

आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीविषयी केपीआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले, ‘या वर्षाची सकारात्मक सुरुवात करत आम्ही पहिल्या सहामाहीत अपेक्षेप्रमाणे चौफेर कामगिरी केली. मोबिलिटी क्षेत्रातील कंपन्या नवे तंत्रज्ञान, इलेक्ट्रिफिकेशन, वाहन ऑटोनॉमी, कनेक्टिव्हिटी आणि पर्सनलायझेशनमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत असल्यामुळे आमच्यासमोर मुबलक संधी आहेत. आमच्याकडे काही चांगले प्रकल्प असून गेल्या वर्षी घोषणा करण्यात आलेल्या मोठ्या व धोरणात्मक प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे आतापर्यंतच्या कालावधीचा योग्य आढावा घेणे आम्हाला शक्य झाले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये उत्पन्न आणि ऑपरेटिंग मार्जिन्समध्ये इच्छित वाढ होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.’

सचिन टिकेकर, अध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, केपीआय म्हणाले, ‘आमच्या महत्त्वाच्या ग्राहकांकडून चांगली मागणी येत असून त्यांच्यासोबत भागिदारी करत त्यांच्या कंपनीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या तीन तिमाहींपासून सातत्याने कमी होत आहे. आम्ही नोकरभरतीची गुणवत्ता वाढवण्यात तसेच सुरळीत अमलबजावणीसाठी योग्य सुविधा व तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहोत. कंपनीने शाश्वततेवर भर देण्यास सुरुवात केली आहे आणि कर्मचाऱ्यांसह एकत्रितपणे पुढचा मार्ग आखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक स्वच्छ, स्मार्ट व सुरक्षित जग निर्माण करण्यातील योगदान विस्तारण्यासाठी आम्ही उत्सुक असून त्यासाठी उत्पादने, कामकाज व कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading