Friday, May 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रघुनाथ गावडे

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नागपूर येथील महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून या रिक्त जागी नंदूरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी राज्यातील आयएएस दर्जाच्या 31 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून त्यात परभणीतील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांचाही समावेश आहे. गोयल यांची नागपूरात महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading