fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETECHNOLOGYTOP NEWS

Emergency alert मेसेज मागील सत्य आले समोर

पुणे : आज (20 जुलै) सकाळी साडे दहाच्या सुमारास अनेकांच्या मोबाईवर अलर्ट मेसेज आला. यावेळी मोबाईल अचानक व्हायब्रंट होवून मोठमोठ्याने वाजू लागला. नेमका हा मेसज कसला आणि कोणी पाठवला याबाबत कोणालाच काही कळेना. शिवाय ओके शिवाय यामध्ये दूसरा कोणताच पर्याय येत नव्हता. तसेच हा मेसेज जिओ , वोडाफोन  वगळता अन्य सीम धारकांना किंवा iPhone, iPad वर आलेला नाही. त्यामुळे मोबाईल धारक चिंतेत पडले. अन् सोशल मीडियावर याच मेसज ची चर्चा सुरू झाली. पण आता या मेसेज मागच कारण समोर आलं आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार, नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉप-अप तयार करण्यात आला आहे. हा संदेश सर्व टेलिकॉम कंपन्यांकडून पाठवला जात असून काळजी करण्याचे किंवा घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मुसळधार पावसामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो म्हणून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना देणारा हा संदेश असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने म्हटले आहे. या संदेशाबद्दल नागरिकांनी घाबरून न जाता तो केवळ जनतेच्या सुरक्षेसाठी आहे हे समजून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. 

अलर्ट मेसेज कशासाठी असतो ?

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येतो. भविष्यात आपल्या भागात काही आपत्कालीन सूचना द्यायची असेल तर आपल्या मोबाईलवर याप्रकारे अलर्ट दिला जाईल. आपल्याला असा अलर्ट आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचाव्यात आणि त्यांचे पालन करावे, असे आवाहनही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या पोर्टलवर नमूद केले आहे. मात्र, आज आलेले मेसेज हे या विभागाकडून पाठवण्यात आलेले आहेत, या बाबत अजूनही कोणता अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.   

 

Leave a Reply

%d bloggers like this: