Tuesday, July 7, 2026
Latest NewsPUNE

मंडई म्हसोबा ट्रस्टतर्फे ५०० विद्यार्थ्यांना फुलस्केप वहयांची भेट


अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा उपक्रम ; तब्बल १५०० फुलस्केप, ३०० लहान वह्या आणि १७५ रायटिंग पॅडचे वाटप

पुणे : अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांसोबतच शिक्षण ही देखील मुलभूत गरज आहे. उद्याच्या समाजाचे संकल्पचित्र करण्याचा मार्ग केवळ शिक्षणातून जातो. त्यामुळे शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे ५०० विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्यांची भेट देण्यात आली. तब्बल १५०० फुलस्केप वह्या, ३०० लहान वह्या आणि १७५ रायटिंग पॅड गरजू मुला-मुलींना देण्यात आले.

महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल पवार, गुन्हे शाखा पोलीस अंमलदार महेंद्र कडू, श्री कसबा गणपती मंडळाच्या उपाध्यक्ष दीपा तावरे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे देखील पूजन करण्यात आले. उत्सवाचे यंदा १९ वे वर्ष आहे. ट्रस्टचे निवृत्ती जाधव, नितीन जाधव व सुधीर साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. गौरव गद्रे, सोमनाथ सूर्यवंशी यांनी उपक्रमाला सहकार्य केले.

सुनिल पवार म्हणाले, प्रत्येकाला उत्तम वाचता आणि लिहिता आले पाहिजे, हे शिक्षणाचे मुलभूत उद््दीष्ट आहे. लेखनासाठी वही आवश्यक आहे. वही हे सरस्वतीचे वाहन आहे, हे वाहन घेऊन विद्यार्थ्यांची उत्तम जडण-घडण होईल. प्रत्येक देवस्थानाने असे कार्य केले, तर संपूर्ण समाजाचे चित्र बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading