Monday, August 31, 2026
BusinessLatest News

पुण्यात उद्या ‘सिंपल’तर्फे स्टार्ट-अप संस्थापकांची पहिली ‘डीटूसी अनलॉक’ परिषद 

पुणे : डीटूसी (डायरेक्ट टू कस्टमर) या क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांच्या संस्थापकांची एक शिखर परिषद पुण्यात येत्या २१ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. सिंपल या भारतातील अग्रगण्य चेकआउट नेटवर्कने या आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे. ‘डीटूसी अनलॉक’ या नावाने आयोजित होणारी ही अशा प्रकारची पहिलीच परिषद असणार आहे. डीटूसी कंपन्यांचे ब्रॅंडिंग व कामकाज यांची व्याप्ती कशी वाढवावी या विषयावर, तसेच व्यवसायासंबंधी इतर अनेक प्रश्नांवर या परिषदेत उहापोह होणार आहे. ‘सिंपल’तर्फे आज ही घोषणा करण्यात आली.

पुण्यात होणाऱ्या या पहिल्या-वहिल्या ‘डीटूसी अनलॉक’ परिषदेतील उपस्थितांना, डीटूसी ब्रँड बिल्डिंग आणि स्केलिंग या विषयावर उद्योगातील समवयस्कांशी आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. ‘नर्सरी लाइव्ह’ या भारतातील सर्वात मोठ्या बागकामविषयक प्लॅटफॉर्मचे संस्थापक नंदू सिंग, ‘विगल्स’ या मल्टी-चॅनेल पेट केअर ब्रँडच्या संस्थापिका अनुष्का अय्यर आणि ‘आद्या’ या हस्तनिर्मित चांदीच्या दागिन्यांच्या ब्रँडच्या संस्थापिका सायली मराठे यांच्यासह शहरातील इतर काही स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. स्पोर्ट्स फूटवेअर ब्रँड असलेल्या ‘हीलियम’चे संस्थापक सिद्धार्थ जैन, आशिया व भारतात प्रथमच मीड बीअर बनविणाऱ्या ‘मूनशाइन मीडर्ट’ या कंपनीचे सह-संस्थापक व संचालक नितीन विश्वास यांचाही या परिषदेत समावेश असेल.

या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘सिंपल’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी नित्या शर्मा म्हणाले, “भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डीटूसी बाजारपेठांमध्ये पुण्याचा समावेश होतो. येथील डीटूसी परिसंस्थेला अधिक सक्षम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ‘डीटूसी अनलॉक’ हे आमच्या व्यवसायातील संस्थापकांचे खास संमेलन आहे. डीटूसी उद्योजकांनी एकत्र यावे, नाविन्यपूर्ण कल्पनांची एकमेकांमध्ये देवघेव करावी आणि मौल्यवान स्वरुपाची माहिती मिळवावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे डझनभर उद्योजकांनी या परिषदेत उपस्थित राहण्याविषयी स्वारस्य दाखवले आहे. ‘डीटूसी अनलॉक’ या परिषदेत या उद्योजकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे.”

सिंपल या स्टार्टअप कंपनीशी भारतातील २६ हजारांहून अधिक व्यापारी आणि एक कोटीहून अधिक ग्राहक जोडले गेलेले आहेत. या कंपनीने सादर केलेल्या ‘वन-टॅप पे’ या क्रांतिकारी सुविधेमुळे आणि अत्याधुनिक चेकआउट नेटवर्कमुळे या सर्वांना विश्वासार्ह सुविधा मिळत आहेत. याव्यतिरिक्त, ‘सिंपल’ने डीटूसी ब्रँड्ससाठी एका बूस्टर पॅकेजची स्थापना केली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्सविषयीचा सल्ला, पतपुरवठा आणि कायदेशीर सहाय्य या गोष्टी अनुदानित पद्धतीने मिळू शकतात. व्यावसायिकांना वेळेवर मदत व्हावी आणि त्यांना प्रगती साधता यावी, या दृष्टीने हे पॅकेज खास तयार करण्यात आले आहे.

उद्योग क्षेत्रातील काही अहवालांनुसार, भारतीय डीटूसी बाजारपेठेत २०२२मध्ये अंदाजे १२ अब्ज डॉलरची उलाढाल झाली आहे आणि २०२७पर्यंत ही उलाढाल ६० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या वाढत्या आवडी-निवडी, वाढीव गुंतवणूक आणि तांत्रिक प्रगती यांमुळे डीटूसी बाजारपेठ लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. डीटूसी व्यापाऱ्यांना क्रेडिट अॅक्सेस, डिस्कव्हरॅबिलिटी आणि सीमलेस पेमेंट यांसह इतरही विविध घटकांबाबत सर्वतोपरी सहाय्य करून ही प्रगती साध्य करण्यात आघाडीवर राहण्याचे ‘सिंपल’चे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading