बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचा शुभमन गिलशी करार
पुणे– बजाज अलियान्झ लाइफ या आघाडीच्या खासगी विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू शुभमन गिल यांच्याशी करार केल्याचे जाहीर केले. ग्राहकांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय साकार करण्यासाठी मदत करणारा ब्रँड म्हणून कंपनीचा प्रवास यामुळे आणखी समृद्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात शुभमन गिल यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हा तरुण खेळाडू अनेकांसाठी प्रेरणादायी असून शिस्तबद्ध पद्धतीने आयुष्याचे दीर्घकालीन ध्येय साकार कसे करावे याचे तो उत्तम उदाहरण आहे. ( Bajaj Allianz Life Insurance signs deal with Shubman Gill)
या भागिदारीविषयी शुभमन गिल ( Shubman Gill) म्हणाले, ‘बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्ससह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागिदारी एखादा सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या भागिदारीइतकीच महत्त्वाची आहे. फक्त इथे जास्त मोठा, म्हणजे आयुष्याचा सामना जिंकायचा आहे. माझ्यासाठी एकाग्रता आणि सातत्य अतिशय महत्त्वाचे आहे. बजाज अलायन्झ लाइफने ग्राहकांप्रती बांधिलकी दाखवत तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करून देत याच विचारसरणीचे दर्शन घडवलेले आहे. बजाज अलायन्झ लाइफसह केलेल्या या भागिदारीविषयी मी उत्सुक असून एकत्रितपणे आम्ही भारतातील सर्वात भरवशाचे लाइफ गोल पार्टनर बनू आणि विश्वासाचे चौकार मारू.’
या सहकार्याविषयी बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी चंद्रमोहन मेहरा म्हणाले, ‘शुभमन यांच्यासारख्या लाखो भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने लाइफ गोल चॅम्पियन असलेल्या खेळाडूशी भागिदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ते तरुण भारतीयांच्या वृत्तीचे प्रतीक आहेत. दीर्घकालीन नियोजन आणि सातत्य यांच्या माध्यमातून जीवनध्येयं साकार करता येतात याचा त्यांना विश्वास वाटतो. खेळाच्या प्रत्येक प्रकारात गुणवत्ता साध्य करण्याची त्यांची चिकाटी, मूल्यवर्धित उत्पादने व ग्राहकाभिमुख सेवांच्या मदतीने भारतीयांना त्यांची जीवनध्येये साकार करण्यासाठी मदत करणारा पसंतीचा ब्रँड बनण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे.’
शुभमन गिल यांनी पहिल्यांदाच विमा ब्रँडशी सहकार्य केले आहे. त्यांचा समावेश असलेली मार्केटिंग कॅम्पेन्स आणि उत्पादनांची माहिती लवकरच आमच्या विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल.
