पीव्हीपी कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे ‘एक्झिट’ प्रदर्शन संपन्न
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वास्तुरचनांचे प्रदर्शन
पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचे ‘एक्झिट’ हे वास्तुकला प्रदर्शन सॅलेसबरी पार्क मधील महावीर जैन इंग्रजी शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. भारतातील अनेक नामवंत वास्तुरचनाकारांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष अभय पुरोहित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय छाजेड, सरचिटणीस जितेंद्र पितळीया, प्राचार्य प्रसन्न देसाई व वरिष्ठ प्राध्यापक शेखर गरुड उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पियुषा पटवर्धन व आशिक जैन यांनी आपले व्यावसायिक अनुभव सर्वांसमोर मांडले. प्रा. शिवराम सोमसुंदरम व प्रा.अदिती निरगुंडकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी कल्पक भंडारी, केतन नानल, विनिश देसाई व मानस मराठे या चार वास्तुरचनाकारांनी आपले वास्तुकलेबद्दलचे विचार व अनुभव विद्यार्थ्यांपुढे मांडले. प्रा. निरंजन गर्दे यांनी सूत्रसंचालन केले आणि मान्यवरांसोबत संवाद साधला. या सर्व प्रदर्शनाचे आयोजन प्रा.विजया श्रीनिवासन, प्रा.वैभव कुलकर्णी व प्रा.आशीष श्रीवास्तव यांनी केले होते.
