Sunday, June 14, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दोन दिवसांपासून बंद फ्लॅटमध्ये पडून होता मृतदेह; अभिनेते रवींद्र महाजनी यांचा दुर्दैवी अंत  

पुणे : ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटातून समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारे एकेकाळचे सुपरस्टार अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आज निधन झाल्याचे उघडकीस आले आहे. ते 77 वर्षाचे होते. पुण्यातील तळेगाव येथे एका फ्लॅटमध्ये रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कळते आहे. अभिनेता गश्मिर महाजनी यांचे ते वडील. आपल्या देखण्या, रुबाबदार अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. अलीकडे देऊळ बंद, पानीपत आदी सिनेमात अभिनेते रवींद्र महाजनी दिसले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गश्मीरची आई त्याच्याबरोबर मुंबईत राहते. तर रवींद्र महाजनी मागील 8-9 महिन्यांपासून पुण्याच्या तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते.  शुक्रवारी त्यांच्या फ्लॅट मधून दुर्गंधी येत होती. त्यानंतर शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना कळवले. तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे उघड झाले. यावेळी बंद  फ्लॅटमध्ये त्यांच्या मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने शरीर, चेहरा काळा पडला होता. त्यांच्या मृतदेहाशेजारी WHEY नावाच्या प्रोटीन पावडरचा डबा दिसत आहे.

दरम्यान, शवविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading