Monday, May 25, 2026
BusinessLatest News

एज्‍युकेशन फायनान्सिंग प्‍लॅटफॉर्म प्रोपेल्‍डने एनबीएफसी दर्जा मिळाल्‍यानंतर पुण्‍यातील सर्वोच्‍च शैक्षणिक संस्‍थांसोबत केला सहयोग 

पुणे : पुण्‍यातील विद्यार्थ्‍यांना आता फक्‍त एका क्लिकसह आर्थिक बाबींसंदर्भात दिलासा मिळेल!  २०१७ च्या सुरुवातीला स्थापन झाल्यापासून २००,००० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक महत्त्‍वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत केलेले फिनटेक व्‍यासपीठ प्रोपेल्‍डने आता सर्वोच्च महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांसोबत नवीन सहयोग करण्‍याची घोषणा करत आपले लक्ष पुण्‍याकडे वळवले आहे.

सर्वांना शिक्षण सुविधा उपलब्‍ध करून देणारे नाविन्‍यपूर्ण आर्थिक सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍यासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या बेंगळुरू-स्थित प्रोपेल्‍डने सानुकूल कर्ज उत्‍पादने प्रदान करण्‍यासाठी यापूर्वी पुण्‍यातील बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्‍स, लेक्झिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप अॅण्‍ड एक्‍सलन्‍स, मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि डीवाय पाटील युनिव्‍हर्सिटी अशा आघाडीच्‍या शैक्षणिक संस्‍थांसोबत सहयोग केला आहे. तसेच, कंपनीला जुलैच्‍या पहिल्‍या आठवड्यात भारतीय रिझर्व्‍ह बँकेकडून (आरबीआय) तिच्‍या उपकंपनीसाठी नॉन-बँकिंग फायनन्शियल कंपनी (एनबीएफसी) परवाना मिळाला आहे. या परवान्यासह प्रोपेल्‍ड प्रत्‍यक्ष कर्ज देण्‍यास सक्षम होईल आणि सुविधा न पोहोचलेल्‍या द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील कर्जदार प्रोफाइल्‍समध्‍ये मोठ्या प्रमाणात विविधता आणेल.

कंपनीच्‍या अपेक्षांबाबत सांगताना प्रोपेल्‍डचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक बिभू प्रसाद दास म्‍हणाले, ”आम्‍हाला पुण्‍यातील काही सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्‍थांसोबत सहयोग करण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे. तसेच आम्‍ही पुण्‍यातील आमचे सहयोगी नेटवर्क अधिक वाढवण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्‍यांचा आर्थिक तणाव दूर करत, त्‍यांना कर्जाची परतफेड करण्‍याबाबत चिंता करण्‍याऐवजी शिक्षणावर अवधान केंद्रित करण्‍यास मदत करत पाठिंबा देण्‍याचे आमचे मिशन आहे.”

 

विद्यार्थ्‍यांना शिक्षणासंदर्भात मदतीचा हात पुढे करण्‍याव्‍यतिरिक्‍त प्रोपेल्‍ड आपले सहयोगी महाविद्यालये व युनिव्‍हर्सिटीजना जलदपणे विद्यार्थी ऑनबोर्ड करण्‍यामध्‍ये आणि सुलभ फायनान्सिंग पर्यायांसह अधिकाधिक विद्यार्थ्‍यांचे लक्ष वेधून घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी डेटा-केंद्रित माहितीचा फायदा घेत आहे. तसेच ट्यूशन फीला कर्जांमध्‍ये बदलत आणि शैक्षणिक संस्‍थांना फी गोळा संदर्भात सामना कराव्‍या लागणाऱ्या समस्‍यांचे निर्मूलन करत प्रोपेल्‍ड संपूर्ण शैक्षणिक परिसंस्‍थेसाठी फायनान्सिंगमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.

 

प्रोपेल्‍डसोबत सहयोग करण्‍याच्‍या फायद्यांबाबत आपले मत व्‍यक्‍त करत मिटकॉन पुणेच्‍या अॅडमिशन्‍सचे प्रमुख  हेमंत सोलंकी म्‍हणाले, ”प्रोपेल्‍डच्‍या माध्‍यमातून शैक्षणिक कर्ज प्रदान करत आम्‍ही यापूर्वी आर्थिक समस्‍यांचा सामना कराव्‍या लागलेल्‍या विविध व प्रतिभावान विद्यार्थ्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे नोंदणीमध्‍ये वाढ झाली आहे, तसेच विद्यार्थी कायम राहण्‍याच्‍या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. प्रोपेल्‍डच्‍या कार्यक्षम कर्ज वितरण प्रक्रियेमुळे आमच्या संस्थेवरील प्रशासकीय भार कमी झाला आहेज्यामुळे आम्हाला दर्जेदार शिक्षण देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येत आहे.”

 

इन्‍कम शेअरिंग अॅग्रीमेंट्स आणि स्‍टडी नाऊ अॅण्‍ड पे लॅटर अशा आर्थिक सोल्‍यूशन्‍समध्‍ये अग्रणी असलेली प्रोपेल्‍ड विद्यार्थ्‍यांना परतफेड करण्‍याच्‍या मुदतीचे नियोजन करण्‍यामध्‍ये सक्षम करत शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍याचे लोकशाहीकरण करत आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांना कोणत्‍याही तणावाशिवाय कर्जाची परतफेड करण्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होत आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या कर्ज पात्रतेचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या अध्‍ययन क्षमता व रोजगारक्षमतेवर अवलंबून राहत प्रोपेल्‍ड देशामध्‍ये सांपर्श्विक मुक्‍त शैक्षणिक फायनन्सिंगचे नवीन युग सुरू करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. एनबीएफसी परवान्यामुळे प्रोपेल्‍डच्‍या प्रत्‍यक्ष कर्ज देण्‍याच्‍या तत्त्वाला चालना मिळाली आहे. या परवान्यासह कंपनीचा आपल्‍या २,००० हून अधिक सहयोगी नेटवर्कमध्‍ये सर्वोत्तम व दीर्घकालीन कर्ज उत्‍पादने देण्‍याचा, तसेच आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत आपले एकूण लोन बुक २,००० कोटी रूपयांपर्यंत वाढवण्‍याचा मनसुबा आहे.

 

गतीशील टेक पायाभूत सुविधा आणि अद्वितीय तंत्रज्ञान पाठिंब्‍यासह संचालित प्रोपेल्‍ड पूर्णत: डिजिटल कर्ज प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून जलद मान्‍यता व कर्ज वितरण देण्‍यासाठी पारंपारिक आर्थिक पद्धतींमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. सिरीज-बी निधीसाह्य कंपनीला इंडियन एंजल नेटवर्कस्टेलारिस व्हेंचर पार्टनर्सवेस्टब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट आणि इंडिया क्वॉटियंटसह उच्चभ्रू गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहेज्‍यांनी शेवटच्या फेरीत ३५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading