महिला आणि मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांच्या निवारणासाठी डिजिटल हेल्थ इनोवेशन चॅलेंज
मुंबई : मेडिक्स ग्लोबल या आघाडीच्या हेल्थकेयर मॅनेजमेंट कंपनीने डिजिटल हेल्थ चॅलेंज २०२३ सुरु करण्यात आल्याची घोषणा आज केली. या चॅलेंजमध्ये महिलांचे आरोग्य व मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या निवारणासाठी आधुनिक डिजिटल आरोग्य उपाययोजना तयार करण्यासाठी हेल्थटेक स्टार्ट-अप्स व इनोवेटर्सना आमंत्रित करण्यात आले आहे. (Digital Health Innovation Challenge to address women and mental health issues)
आरोग्य देखभाल सेवांची पोहोच वाढवण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी, भारतामध्ये आरोग्य देखभाल इकोसिस्टिमची दीर्घकालीन व्यवहार्यता वाढवण्यासाठी उपाययोजना तयार करत असलेले स्टार्ट-अप्स शोधणे हे या चॅलेंजचे उद्दिष्ट आहे. चॅलेंजसाठी २१ जुलैपर्यंत प्रवेशिका सादर करायच्या आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय वृद्धी होत आहे. पण गेल्या काही वर्षात देशभरातील कार्यबळामध्ये महिलांच्या संख्येत घट होत आहे. ही बाब महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अधिक चांगली देखभाल प्रदान करण्याची गरज असल्याचे दर्शवते.
मानसिक आरोग्य हा देखील एक अतिशय महत्त्वाचा चिंताजनक विषय आहे, ज्याचा उत्पादनक्षमता व आर्थिक विकासावर थेट प्रभाव पडतो. मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांमुळे भारतीय एम्प्लॉयर्सना दरवर्षी जवळपास १४ बिलियन यूएस डॉलर्सचा प्रचंड खर्च सहन करावा लागतो. भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसने (NIMHANS) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास १५० मिलियन भारतीयांना मानसिक आरोग्य देखभाल सेवांची गरज आहे पण फक्त ३० मिलियन लोक त्यांना त्या सेवा हव्या असल्याचे सांगतात. संशोधनातून असे देखील समजते की, मानसिक आरोग्य समस्या सहन करत असलेल्यांपैकी ४०% व्यक्ती मानसिक आजारांना कलंक मानले जात असल्यामुळे त्यांच्या निवारणासाठी मदतीची मागणी करत नाहीत.
मेडिक्सच्या डिजिटल हेल्थ इनोवेशन चॅलेंज २०२३ मध्ये व्यावसायिकांना प्रोत्साहित केले जात आहे, जेणेकरून ते डिजिटल प्लॅटफॉर्म, मोबाईल ऍप्लिकेशन, टेलीमेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर आधुनिक तंत्रांचा उपयोग करून तयार करण्यात आलेले आपले अभूतपूर्व विचार, उत्पादने किंवा सेवा प्रस्तुत करतील. सहयोग आणि कौशल्य यांना प्रोत्साहन देऊन, या चॅलेंजमध्ये अशा नवीन उपाययोजना शोधून काढण्याला प्रेरित केले जात आहे, ज्यामुळे भारतात महिलांमध्ये आणि मानसिक आरोग्य देखभालीमुळे घडून येणाऱ्या प्रभावात क्रांतिकारी बदल होतील.
डिजिटल हेल्थ इनोवेशन चॅलेंज २०२३ बद्दल मेडिक्स ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिगल एट्जमन यांनी सांगितले, “राष्ट्रीय आकडेवारी आणि कार्यबळामध्ये घटत असलेली संख्या भारतामध्ये महिलांच्या मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांचे निवारण करण्याची गरज असल्याचे दर्शवते. या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत पण या समस्यांचे निवारण करण्यासाठी काम करणे ही देखील आमची सामूहिक जबाबदारी आहे. आमचे डिजिटल हेल्थ इनोवेशन चॅलेंज २०२३ अशा स्टार्ट-अप्स आणि इनोवेटर्ससाठी एक मंच तयार करेल जे या समस्यांच्या निवारणासाठी काम करत आहेत आणि त्यांना त्यांच्या उपाययोजना पुढे नेण्यात मदत करेल.”
डिजिटल हेल्थ इनोवेशन चॅलेंज २०२३ मध्ये भाग घेण्यासाठी स्टार्ट-अप्सना ऑफिशियल वेबसाईट www.medix-startups.comवर आपले अर्ज सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २१ जुलै २०२३ पर्यंत प्रवेशिका सादर करायच्या आहेत.
आरोग्य देखभाल तज्ञ, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये काम करणाऱ्या प्रभावी व्यक्तींच्या एका प्रतिष्ठित जजेस पॅनलमार्फत या सर्व प्रवेशिकांचे मूल्यांकन केले जाईल. त्यासाठी नावीन्य, व्यवहार्यता, स्केलेबिलिटी आणि संभाव्य प्रभाव हे निकष ठरवण्यात आले आहेत. पॅनलमध्ये या मान्यवरांचा सहभाग आहे – मेडिक्स ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सिगल एट्जमन; मेडिक्स ग्रुपचे ग्लोबल मेडिकल डायरेक्टर, प्रोफेसर डेविड जेल्टसर; आदित्य बिर्ला एजुकेशन ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्ष, एमपॉवरमाइंड्सच्या संस्थापक आणि अध्यक्ष श्रीमती नीरजा बिर्ला; अक्सा ग्रुपचे आशिया आणि आफ्रिकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी गॉर्डन वॉटसन; मार्श इंडियाचे कंट्री हेड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय केडिया; टाटा एआईएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवीन तहिलयानी; क्वांटम ऍडव्हर्टायजर्सचे अध्यक्ष अजय नानावटी; एमून फंडचे जनरल पार्टनर, यारोन डेनियल; इंडियन एंजेल नेटवर्कच्या सह-संस्थापक, पद्मजा रूपारेल; मेगाडेल्टा कॅपिटलच्या संस्थापक भागीदार/न्यू एंटरप्राइज असोसिएट्स (एनईए इंडिया) च्या सीनियर मॅनेजिंग डायरेक्टर बाला देशपांडे; अचीविंग वूमेन इक्विटी फंड्स (एडब्ल्यूई) च्या मॅनेजिंग पार्टनर आणि संस्थापक श्रीमती सीमा चतुवेर्दी; फिक्कीफ्लोच्या अध्यक्ष श्रीमती सुधा शिवकुमार; आणि इंडिया-इस्त्रायल इन्वेस्टमेंट बँकिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बीडीओ श्रीमती अनात बर्नस्टीन रीच।
हे चॅलेंज दोन महिने चालणार असून ऑगस्ट २०२३ मध्ये समाप्त होईल. चॅलेंजच्या विजेत्यांना संभाव्य फंडिंगपर्यंत पोहोच प्रदान करून, त्यांची उत्पादने बाजारपेठेला अनुरूप आहेत हे व्हॅलिडेट करून, मार्गदर्शन करून आणि भारतामधील आरोग्य देखभाल सेवांशी संबंधित समस्यांच्या निवारणासाठी त्यांच्या उपाययोजना स्वीकारल्या जाव्यात व त्यांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यात मेडिक्स ग्लोबल सक्रिय साहाय्य प्रदान करेल.
