Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘भाबीजी घर पर है’ मध्‍ये ‘नॉटी गर्ल’ चा हास्‍यकल्‍लोळ 

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका  भाबीजी घर पर है  विनोदी व उत्‍साहवर्धक कथानकासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्‍येक वेळी पात्रं विनोदी स्थितीत सापडतात आणि ते पाहून प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होतात. लवकरच प्रेक्षकांना विनोदी एपिसोड पाहायला मिळणार आहे, जेथे विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख सुंदर, मोहक व खोडकर मुलीचा वेष घेतात.  नॉटी गर्ल एपिसोडबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत आसिफ शेख म्‍हणाले, ;पंडित रामफलकडून अम्‍माजीला (सोमा राठोड) अंगूरीचे (शुभांगी अत्रे) जीवन धोक्‍यात असल्‍याचे
समजते. तिच्‍या संरक्षणासाठी मनमोहन तिवारीने (रोहिताश्‍व गौड) अंगूरीला हेवा वाटण्‍यास भाग पाडण्‍याकरिता इतर महिलांसोबत छेडछाड करणे आवश्‍यक आहे. त्‍याचवेळी विभुती, टिलू (सलिम झैदी), टीका (वैभव माथूर) णि सक्‍सेना (सानंद वर्मा) यांना पैसे कमावण्‍यासाठी श्रीमंत उद्योगपतींचे मनोरंजन करणारा मुलींचा समूह –  नॉटी गर्ल गँग बाबत समजते. लवकर पैसे कमावण्‍याच्‍या उद्देशाने ते  नॉटी गर्ल गँग च्‍या सदस्‍या म्‍हणून स्‍वत: वेषांतर करतात आणि त्‍यांचा मॅनेजर म्‍हणून डेव्हिड चाचाची (अनुप उपाध्‍याय) निवड करतात. त्‍यानंतर अंगूरीला हेवा वाटण्‍यास भाग पाडत तिचे जीवन वाचवण्‍यासाठी तिवारी डेव्हिड चाचाला त्‍याच्‍या घरी या गँगला आणण्‍यास सांगतो. पण त्‍या सर्व तिवारीसोबत रोमांस करू लागतात, ज्‍यामुळे अंगूरीला खूप त्रास होतो.
पडद्यावर विविध, मनोरंजनपूर्ण भूमिका साकारण्‍याबाबत विभुती नारायण मिश्रा ऊर्फ आसिफ शेख म्‍हणाले, आम्‍ही विनोदी कथानक व पात्रांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करण्‍याचा प्रयत्‍न करतो. मी मालिकेमध्‍ये साकारलेल्‍या प्रत्‍येक महिला पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा व कौतुकाचा वर्षाव केला आहे. मी पडद्यावर सर्व वयोगटातील महिलांची भूमिका साकारली आहे आणि खरे सांगायचे तर मी महिला पात्र साकारण्‍याचा मनमुराद आनंद घेतला आहे. हे आव्‍हानात्‍मक असले तरी अत्‍यंत मनोरंजनपूर्ण आहे. पुरूष कलाकाराला महिलेच्‍या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना नेहमी धमाल वाटते आणि मला सांगावेसे वाटते की, मी महिलेच्‍या वेषात सुंदर दिसतो (हसतात). माझ्या मेकअप रूममध्‍ये माझ्या महिला पात्रांसाठी सर्व आकाराचे व प्रकारचे कपडे आहेत. नॉटी गर्लची भूमिका साकारण्‍याचा अनुभव अत्‍यंत आनंददायी होता. पुरूष कलाकाराने महिला पात्र साकारणे सोपे नाही. त्‍यासाठी खूप तयारी करावी लागते, आवाजामध्‍ये बदल करण्‍यापासून मेकअप, कॉस्‍चूम्‍स, हावभाव व वर्तणूक योग्‍य असावी लागते. ही आव्‍हानात्‍मक व वेळ-खाऊ प्रक्रिया आहे, ज्‍यामध्‍ये आऊटफिट, मेकअप व संवादासह तासनतास तालीम करावी लागते. मोहकता व ओम्‍फ फॅक्‍टर दिसून येण्‍यासाठी सर्वकाही सुरळीत असावे लागते. मी संपूर्ण प्रक्रियेचा मनसोक्‍त आनंद घेतला आहे आणि आता मला त्‍यामध्‍ये आरामदायी वाटते. हे वेषांतर पाहून आम्‍ही सर्वजण अचंबित झालो आणि आम्‍ही शूटिंगच्‍या वेळी खूप धमाल केली. आम्‍हाला पहिल्‍यांदा पाहिल्‍यानंतर शुभांगी (अंगूरी भाबी) व विदिशा (अनिता भाबी) अचंबित झाल्‍या आणि खदखदून हसू लागल्‍या. मला खात्री आहे की, प्रेक्षक देखील तितकेच सरप्राइज होतील. मी नॉटी गर्ल्‍सच्‍या
खोडकरपणाप्रती त्‍यांची प्रतिक्रिया पाहण्‍यास उत्‍सुक आहे. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन व उत्‍साहवर्धक घेऊन येण्‍यासाठी आम्‍ही सतत संशोधन, खूप विचारविनियम करतो आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी अद्भुत व मनोरंजनपूर्ण पात्रांची निर्मिती करतो. प्रेक्षकांनी प्रत्‍येक पात्रावर प्रेमाचा वर्षाव केला आहे, तसेच ते पात्र पाहण्‍याचा आनंद देखील घेतला आहे. यामधून मला असे अधिक पात्रं साकारण्‍यास आणि प्रत्‍येक वेळी माझ्या पूर्वीच्‍या
परफॉर्मन्‍सना मागे टाकण्‍यासाठी प्रयत्‍न करत राहण्‍यास प्रेरणा मिळते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading