Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत दीप्ती सोनावणे साकारतीये खालनायिकेची भूमिका

झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’  या  मालिकेत आता ‘दुर्गेश्वरी’ अर्थात अभिनेत्री दीप्ती सोनावणे हिची एंट्री झाली आहे. यापूर्वी दीप्ती आपल्याला  ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत चंदाची भूमिका साकारताना दिसली होती. तसेच दीप्ती सोनवणे हिने ‘चला हवा येऊ द्या’च्या शेलेब्रिटी पॅटर्न या मंचावरून प्रेक्षकांना हसवण्याचा ही प्रयत्न केला होता. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या नवीन मालिकेबद्दल दीप्ती सोनावणेला काय वाटते? हे तिच्याकडून जाणून घेवूया

१. तुला शिकवीन चांगलाच धडा  ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?

–  ह्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही मालिका शिक्षण मोठं की पैसा मोठा ह्यावर भाष्य करणारी मालिका आहे. तसंच अक्षरा आणि अधिपतीची खूप सुंदर अशी प्रेम कथा आहे.

 

२. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?

–  माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर मी ‘दुर्गेश्वरी’ नावाची खलनायिकाची भूमिका साकारत आहे. प्रेम कथे मध्ये खलनायिका ही खूप महत्वाचा भाग असते. हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळे आणि मनोरंजक आहे. दुर्गेश्वरी ही भुनेश्वरीची लांबची बहीण असते, ती आणि तिची मुलगी चंचला  भुवनेश्वरीच्या घरी आश्रित म्हणून राहतात. दुर्गेश्वरी भुवनेश्वरीच्या सतत मागे मागे वावरते. चंचलाच लग्न अधिपतीशी व्हावं म्हणून दुर्गेश्वरीचे खूप प्रयत्न चालू आहे. आता पुढे काय होणार हे आपल्याला मालिके मध्ये पाहायला मिळेल.

३. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?

    या मालिकेची पूर्ण टीम खूपच चांगली आहे. आमचं एकमेकांबरोबर खूप छान बॉण्डिंग झालं आहे. कुठच्याही मालिकेचं यश हे टीमवर्क वर अवलंबून असतं आणि तशीच आमची टीम आहे.

४. तुझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगा / आता पर्यंतचा प्रवास ?

मला सर्वात प्रथम झी मराठीचे खूप आभार मानायचे आहेत. कारण माझा पहिला प्रवास झी मराठी सोबतच सुरु झाला. झी मराठी  हे माझं माहेर आहे.  याच वाहिनीवरील माझी पहिली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. या दोन मालिकांमध्ये झी मराठीने मला खूप मोठ्या व मनोरंजक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिली.आज मी जिथे कुठे उभी आहे ते झी मराठीमुळेच.

पाहायला विसरू नका “तुला शिकवीन चांगलाच धडा”  सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading