Wednesday, June 17, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

ऐतिहासिक क्षण ; ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने झेपावले

श्रीहरीकोटा : भारतासाठी ऐतिहासिक क्षण असलेल्या ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. श्रीहरीकोटा येथे शुक्रवारी (दि. 14) दुपारी अडीच च्या सुमारास  ‘चांद्रयान-3’चे यशस्वी प्रक्षेपण झाले. हे रॉकेट अवकाशात जेपावताच इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भारतीयांनी विजयी जल्लोष केला. टाळ्यांच्या आवाजांनी इस्रोचीरूम दणाणून गेली. त्याच बरोबर हे प्रेक्षपण पाहण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या भारतीयांनीही टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाच लक्ष लागलं आहे. कारण चांद्रयान – 3  ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल 615  कोटी रुपये खर्च केले आहेत.

आज तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मात्र, चांद्रयान-3 ला अजून 40 दिवसांचा प्रवास पूर्ण करायचा आहे. चांद्रयान-3 ची वाटचाल ही ठरल्या प्रमाणे राहिली तर येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. यावेळी विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading