उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर दाखल
मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी ते शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयामध्ये त्यांच्या हातावर लहानशी शस्त्रकिया होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे प्रतिभा पवार यांच्या हातावरील शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांना रात्री 8.30 वाजता घरी सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर अजित पवारांनी काकूंची सिल्व्हर ओकवर भेट घेतली आहे. तसेच त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
