OMG 2 चा टीझर आऊट; अक्षय कुमार दिसणार शंकराच्या भूमिकेत
सोशल कॉमेडी ड्रामा असलेल्या OMG – Oh My God चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज अक्षयकुमारने सोशल मिडियावर OMG 2 हा चा टीझर रिलीज करत ही माहिती दिली आहे. पुढील महिन्यात 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘नास्तिक असो किंवा आस्तिक असो पण जेव्हा कोणी देवाला संकटात हाक मारतो, तेव्हा देव त्याची मदत करतोच’, असा मेसेज या टीझर मधून देण्यात आला आहे.

OMG मध्ये अक्षयकुमारने कृष्णाची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात तो शंकराच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. OMG मध्ये अक्षयकुमार सोबत परेश रावल, मिथुन चक्रवर्ती दिसले होते. तर OMG 2 मध्ये पंकज त्रिपाठी, यामी गौतम अशी स्टारकास्ट असणार आहे. OMG ने अंधश्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तर सिक्वेल हा शिक्षण व्यवस्थेवर आधारित असल्याचे कळते. अमित राय लिखित आणि दिग्दर्शित, OMG 2 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी सनी देओलचा गदर 2 देखील प्रदर्शीत होणार आहे.
