Monday, August 31, 2026
BusinessLatest News

भारत फोर्ज तर्फे शाश्वत उपाय सुविधांसह ग्रामीण समुदायांचे सक्षमीकरण

पुणे : पुणेस्थित भारतीय उद्योगसमूह भारत फोर्जने ग्रामीण समुदायांवर सकारात्मक परिणाम करणारे शाश्वत उपक्रम राबवून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीत लक्षणीय प्रगती केली आहे. लोकार्पण सोलाहा सौर जलपंप प्रणाली या त्यांच्या नवीनतम प्रकल्पाद्वारे भारत फोर्जने तीन गावांमध्ये स्वच्छ आणि सुलभ पाणी उपलब्ध करून दिले असून आणखी एका गावातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुभव वाढवला आहे.

रुई गावातभारत फोर्जने लोकार्पण सोलाहा म्हणून ओळखली जाणारी २४ किलोवॅट क्षमतेची सोलर वॉटर पंप यंत्रणा बसवली आहे. सौर पॅनेलने सुसज्ज असलेली ही यंत्रणा गावासाठी पाण्याच्या सुलभतेत क्रांती घडवून आणेल आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी सहज उपलब्ध होईल हे सुनिश्चित करेल. सुमारे ३,६०० ग्रामस्थांना या शाश्वत उपायाचा थेट फायदा होईल. वीज आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करून या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींच्या मोठ्या वीज बिलांचा बोजाही कमी होईल आणि संपूर्ण समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल.

त्याचप्रमाणेबेलेवाडी आणि जायगाव या गावांमध्येभारत फोर्जने अनुक्रमे १२ KW आणि २४ KW क्षमतेच्या सौर जलपंप प्रणाली कार्यान्वित केल्या आहेत. या प्रणालींमुळे अनुक्रमे ३,६०० आणि २,३०० गावकऱ्यांना सहज पाणी उपलब्ध होईल. सौरऊर्जेच्या शक्तीचा उपयोग करून ग्रामीण समुदायांचे जीवन सुधारताना पर्यावरणावरील प्रभाव कमी करणे हे भारत फोर्जचे उद्दिष्ट आहे.

शिक्षणाचे महत्त्व ओळखून भारत फोर्जने ठाकरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतही ५ किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसवली आहे. शाळेच्या वेळेत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा अनुभव घेणाऱ्या  १२० शालेय विद्यार्थ्याना या उपक्रमाचा थेट फायदा होईल. सौर यंत्रणेमुळे शाळेच्या संगणक प्रयोगशाळा आणि ई-लर्निंग केंद्रांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित होईलशैक्षणिक स्त्रोतांमध्ये विनाअडथळा अॅक्सेस मिळेल आणि विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव उंचावेल.

भारत फोर्ज शाश्वत विकासासाठी आणि लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी समर्पित आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीवर सतत लक्ष केंद्रित करून सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading