पीएमपीएमएल कडून प्रवासी दिन उपक्रम सुरू
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचलन कार्यक्षेत्रातील विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशी वर्गास चांगली, तत्पर
व विश्वसनीय बससेवा देण्याच्या दृष्टीने व बससेवेबाबत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींची तातडीने दखल घेणे
आवश्यक असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतून
बससेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रवाशी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी व प्रवाशांचे मोलाचे मार्गदर्शन परिवहन
महामंडळास मिळावे याकरीता प्रत्येक आगारामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी ०३.०० ते
०५.०० या वेळेत प्रवासी दिन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा
वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास येता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बस
स्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज द्यावेत.
तरी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या प्रवासी दिन या उपक्रमात
जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
