‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची नवीन प्रेमिका!
विविध टेलिव्हिजन मालिकांमध्ये भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री विजयलक्ष्मी माल्या एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये सामील होणार आहे. अभिनेत्री साकारणारी भूमिका मर्यादा मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) व अंगूरी (शुभांगी अत्रे) यांच्या वैवाहिक जीवनात मोठे संकट निर्माण करेल. मालिकेमधील आपल्या भूमिकेबाबत अधिक सांगताना विजयलक्ष्मी माल्या म्हणाल्या, ‘‘मर्यादा विभुतीची (आसिफ शेख) चुलत बहीण आहे. ती त्याला भेटायला येते आणि तिला असलेल्या घातक आजाराबाबत सांगते. तसेच ती सांगते की, तिच्याजवळ जगण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. तिची खरे प्रेम मिळाल्याशिवाय मरण्याची इच्छा नाही, म्हणून ती तिच्या भावाला तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यास सांगते. विभुतीच्या विनंतीवरून मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) तिचा प्रेमी बनण्यास मान्य करतो. पण मर्यादा तिवारीजीच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासमोर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवते, तेव्हा कथानकाला रोचक वळण मिळते.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मर्यादा ही मी आतापर्यंत पडद्यावर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका आहे. ती मनोरूग्ण प्रवृत्ती असलेली सुंदर तरूणी आहे. अभिनेत्री म्हणून मी आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा आनंद घेते. पण मी सुरूवातीला काहीशी नर्व्हस होते, कारण मी आसिफ शेख व रोहिताश्व गौड यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणार होते. पण ते अत्यंत सहाय्यक आहेत आणि त्यांनी मला माझा सर्वोत्तम अभिनय साकारण्यामध्ये मदत केली, ज्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते.’’
अत्यंत लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये भूमिका मिळण्याबाबत आपला आनंद व्यक्त करत अभिनेत्री म्हणाल्या, ‘‘मी पहिल्यांदाच विनोदी शैली साकारत आहे आणि मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या कलाकारांमध्ये सामील होण्यासारखी उत्तम संधी नाही. मी या मालिकेची मोठी चाहती आहे, प्रत्येक एपिसोड आनंदाने पाहत आली आहे. म्हणून मालिका ‘भाबीजी घर पर है’चा भाग असण्याची संधी मिळणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. अंगूरीची भूमिका मला खूप आवडते, तसेच ती बोलणारा संवाद ‘सही पकडे हैं’ देखील खूप आवडतो. मी वास्तविक जीवनात अनेकदा हे वाक्य बोलताना तुम्हाला पाहायला मिळेल. तिला भेटणे आणि हा उत्साह शेअर करणे अविश्वसनीय अनुभव होता. मी मालिकेमधील माझ्या भूमिकेसाठी अत्यंत उत्सुक आहे. तसेच अशा प्रतिभावान व सहाय्यक कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव आशीर्वादासारखा असण्यासोबत अत्यंत आनंददायी आहे.’’
आणखी एका धमाल व मनोरंजनपूर्ण एपिसोडमध्ये विजयलक्ष्मी माल्या यांना मर्यादाच्या भूमिकेत
पाहण्यासाठी पाहत राहा ‘भाबीजी घर पर है’दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
