Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

राज्यातील सर्वात मोठे सौर ऊर्जा उपकरण प्रदर्शनाचे आयोजन…

पुणे – सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) च्या वतीने “सोलर एक्स्पो २०२३” हे नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित केले आहे. दोन दिवसीय प्रदर्शन हे शनिवार आणि रविवार (८ आणि ९ जुलै २०२३ रोजी) डिपी रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे असणार आहे. तब्बल ८६ हून अधिक सौर उर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तू पासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी उपकरणे आहेत. सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा)चे अध्यक्ष रोहन उपासनी यांनी दिली.

रोहन उपासनी म्हणाले की, या प्रदर्शनामध्ये सौर उर्जा क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान तसेच सबसिडीविषयी विविध मान्यवरांचे मार्गदर्शनदेखील यावेळी होणार आहे. तसेच सामाजिक दायित्वाची भावना म्हणून आम्ही रक्तदान शिबिरदेखील यावेळी घेत आहोत. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाचे सहसचिव दिनेश जगदाळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगडपल्लेवार यांच्या हस्ते होणार आहे. या विनामूल्य सौर उपकरण प्रदर्शनाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मास्मातर्फे करत आहोत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading