Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर अजित पवारांचा दावा

मुंबई : आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भाजप सोबत पण जाऊ शकतो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही शिंदे – फडणवीस सरकारला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे. अन् पुढील काळात आम्ही भाजप सोबत घड्याळाच्या चिन्हावर पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे सांगत, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर दावा केला आहे.

नाट्यमयरीत्या झालेल्या दुपारच्या शपथ विधी नंतर नवोदीत उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्या पासून आपण पाहिलं आहे की एका नेतृत्वाखाली देश चालतो. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश चालत आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही शिंदे – फडणवीस सरकारला सहयोगी पक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. पक्ष श्रेष्ठींना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षावर अजित पवार यांनी दावा केल्यानंतर, “आमच्या सोबत सर्व आमदार व पूर्ण पक्ष आहे येथे आकडा सांगायची. गरज नाही”, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading