Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजित पवार यांनी बंड केले – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पुणे : पक्षाच नाव घेवून कोणी निवडणूक लढवत असेल, तर आम्ही त्या भांडणात पडणार नाही. आम्ही तो निर्णय जनतेवर सोपवणार आहोत. माझ्यासाठी हा प्रकार नवीन नाही. जे घडलं त्यांची मला चिंता नाही. उद्या पासून मी पुन्हा नव्याने पक्ष जोडणीसाठी बाहेर पडणार आहे, असे सांगत अजित पवार यांनी बंड केले असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नाट्यमय रित्या झालेल्या घडामोडीं नंतर आज अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारी आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र आज झालेल्या शपथ विधी नंतर पंतप्रधानांचा हा आरोप खोडून निघाला आहे. येत्या 6 जुलैला राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्यात येणार होते. मात्र, त्या आधीच आमच्या काही सहकार्यांनी पक्षा पेक्षा वेगळी भूमिका घेतली. माझ्यासाठी हे नवीन नाही. 1980 ला देखील काही लोक आम्हाला सोडून गेले होते. पण जे पक्ष सोडून गेले ते पराभूत झाले. आता पुन्हा एकदा आम्ही पक्ष बांधणीसाठी मी राज्यभर फिरणार आहे. उद्या कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेवून पुन्हा नव्याने पक्ष बांधणीसाठी मी देशभर फिरणार आहे.

अजित पवारांचे वरिष्ठ आता कोणी दुसरे असतील.. 

शरद पवार म्हणाले, शपथ विधी बाबत मला कल्पना नव्हती. काहींनी मला फोन केला होता. पण त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली व नंतर आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे. पण अजित पवार यांनी माझ्याशी चर्चा केली नाही. त्यांच्या निर्णयाबद्दल मला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. पण अजित पवार यांनी वरिष्ठांना कल्पना दिली असल्याचे सांगितले आहे. असे माध्यम प्रतिनिधींनी सांगितले असता, त्यांचे वरिष्ठ कोणी दुसरे असतील, अशी मिश्किल टिपणी देखील शरद पवार यांनी केली.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई 

पक्षांमध्ये काही लोकांना पक्ष वृद्धीसाठी जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे राष्टरवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मात्र, त्याच वेळी अजित पवार यांच्यावर कारवाई होणार का? यावर उत्तर देण्याचे शरद पवार यांनी टाळले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading