Tuesday, September 1, 2026

Day: April 2, 2023

Latest NewsPUNE

देशातील एकात्मता टिकून राहण्यात संत साहित्याचा मोठा वाटा : डॉ. सदानंद मोरे

पुणे : संतसाहित्य आणि संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा मुख्यत्वे दिंडीच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात झाला आहे. दिंडीची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू असून देशात एकात्मता टिकून राहण्यात संत साहित्याचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वितस्था (काश्मीर) महोत्सवाअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय, साहित्य अकादमी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारपासून वितस्था का विस्तार : काश्मीर महोत्सवाअंतर्गत ‘गोदावरी और वितस्था : एक सांस्कृतिक यात्रा‘ या विषयी चर्चासत्रे, परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ‘संत साहित्य का प्रसार और प्रभाव‘ या विषयावरील परिसंवादात डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले, पूर्वीच्या काळात कीर्तन, प्रवचन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते. दिंडीतही असंख्य भाविक सहभागी होत असत. या दिंड्या ठिकठिकाणी प्रवास करीत असत. त्याद्वारे संत साहित्याचा प्रसार होण्यास बळ मिळत असे आणि ही परंपरा आजही टिकून आहे. दृकश्राव्य माध्यमातून विषयाची मांडणी करताना साहित्यिक विद्याधर पाटंगणकर म्हणाले, साहित्य आणि संस्कृती यामध्ये अतूट नाते आहे. मानवतावादाचा विचार लोकभाषेतून पुढे आला आहे. मराठी मन व मराठी साहित्य याचा जवळचा संबंध आहे. तो आजही विकसित होत आहे. ‘कश्मीर की ऋषिसूफी परंपरा की समावेशी संस्कृति‘ या विषयी मुश्ताक बर्क तर नाट्यशास्त्र आणि लडीशाह याविषयी भाषा सुंबली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुंबली यांनी नाट्यशास्त्राचा आजवरचा प्रवास आणि नवरसाचे सुरेख सादरीकरण अभिनयाच्या माध्यमातून वाद्यासहित केले. त्यास उपस्थितांची दाद मिळाली. ‘संत साहित्य की समन्वय धारा‘ याविषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलताना मराठी संत साहित्याचे अभ्यासक आणि चर्चासत्राचे अध्यक्ष दिलीप धोंगडे म्हणाले की, देशाला संत साहित्याची मोठी परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेण्याचे आणि टिकवून ठेवण्याचे कसोशिने प्रयत्न होत आहेत. संतसाहित्याचा समाजमनावर मोठा प्रभाव आहे. या साहित्यात सर्व सामान्यांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसते. ‘वितस्था का पूर्व इतिहास और महत्त्व‘ या विषयी सतीश विमल यांनी सादरीकरण करीत विषयाची प्रभावीपणे मांडणी केली. शशि शेखर तोशखानी यांनी ‘भारतीय साहित्य के कश्मिरी आचार्य‘ या विषयावर दृक–श्राव्य माध्यमातून माहिती दिली. ‘प्राचीन कश्मीर का निर्माण‘ या विषयावर डॉ. शोनालिका कौल यांनी व्याख्यानातून प्राचीन काश्मीरबाबत माहिती दिली. ‘मिले सूर मेरा तुम्हारा‘ या कार्यक्रमाद्वारे अर्चना हेगडेकर आणि मेघ कल्याण सुंदरम यांनी मराठी आणि काश्मिरी भाषेतील गीते सादर केली. ‘तुज मागतो मी आता‘ मराठी गीताने हेगडेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर काश्मिरी भाषेतील काही लोकगीते कलाकारद्वयींनी सादर केली. काश्मीरमध्ये चित्रीत झालेली हिंदी चित्रपट गीते पडद्यावर दिसत असताना अर्चना हेगडेकर आणि मेघ कल्याण सुंदरम यांनी रसिकांसमोर गीते सादर केली. या अनोख्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन दिवसीय चर्चासत्राचा समारोप प्रख्यात काश्मिरी विद्वान काशिनाथ पंडिता आणि प्रख्यात हिंदी–काश्मिरी लेखक अग्निशेखर यांच्या उपस्थितीत झाला. काशिनाथ पंडिता म्हणाले, चर्चासत्रादरम्यान अनेक अभ्यासकांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले आहेत. या व्यासपीठावरून काश्मीर आणि वितस्था या संदर्भात व्यापक चर्चा झाली असून ही चर्चा अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. अग्निशेखर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमच्या हिंदुत्वाचे मोजमापं घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

छत्रपती सांभाजीनगर : मालेगावातल्या सभेत असंख्य मुस्लीम बांधव आले होते. इथेही आले असतील. माझ्यावर आरोप करतायत की, मी हिंदुत्व सोडलं.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

…तर सावरकरांना भारतरत्न द्या – अजित पवार यांचे आव्हान

छत्रपती संभाजीनगर : महाविकासआघाडीची सभा होऊ नये म्हणून. महत्त्वाचे प्रश्न समोर येऊ नये म्हणून हे उद्योग आहेत. उद्योग येणार नाहीत,

Read More
BusinessLatest News

सोन्यातील गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

मुंबई : सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला

Read More
Latest NewsSports

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब, इऑन वॉरीयर्स संघांची विजयी कामगिरी !!

चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा पुणे :  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अहिंसा दौड’चा समारोप

नागपूर  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सेंट उर्सूला हायस्कूल येथे आयआयएफएल जितो अहिंसा दौडचा समारोप करण्यात आला.

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत

Read More
Latest NewsPUNE

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया पूर्ण ताकदीने उतरणार : सुप्रिया श्रीनेत

पुणे : “आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त काँग्रेस आणि भाजप अशी नसून देशातील लोकशाही वाचविण्यासाठी असलेली अंतिम आरपार लढाई आहे.

Read More
Latest NewsPUNE

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पिंपरीत काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

पिंपरी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटून खून केल्यासारखे आहे असे प्रतिपादन

Read More
Latest NewsPUNE

जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) च्या अध्यक्षपदाचा पदभार डॉ. श्रीराम जोशी यांनी रविवारी स्विकारला. संघटनेच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्योजकांना ताकद दिली तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे : अनेक संस्था राजकारणाचा विचार करुन कार्यक्रम करतात. आमदार, खासदार यांच्या देखील संस्था निवडणूक आली की काही कार्यक्रम घेतात.

Read More
Latest NewsPUNE

‘पीसीसीओईआर’च्या शिरपेचात मानाचा तुरा

पिंपरी :  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या अभियांत्रिकी महविद्यालयाला

Read More
Latest NewsPUNE

सामाजिक संस्था करताहेत संस्कृती मूल्य जपण्याचे कार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी

पुणे : समाजातील अनेक संंस्था या सार्वजनिक म्हणून आहेत, मात्र त्या खाजगी स्वरुपात चालविल्या जातात. सेवा या शब्दाऐवजी या माध्यमातून

Read More
BusinessLatest News

रिअल इस्टेटच्या तेजीसोबत ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ

पुणे : कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे ग्रेनाइट आणि मार्बलची मागणीत वाढ झाली आहे.  साधारण ग्रेनाइट आणि मार्बलचा व्यवसायही

Read More
Latest NewsPUNE

इंडियन मेडिकल अससोसिएशन च्या अध्यक्षपदी डॉ. राजू वरयानी

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन  पुणे चे नवीन म्हणून डॉ. राजू वाऱ्यांनी यांनी सूत्रे हाती घेतली. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे डॉ.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

भारतीय संस्कृतीचे जतन होणे आवश्यक : मीनाक्षी लेखी

पुणे : देशवासीय कोणत्याही परंपरेतून आले असले तरी मी ‘अनेकता मे एकता‘ मानते. नृत्य-नाट्य-गायनादी कलासंस्कृती भारताला पूर्वापार माहित होती. त्यामुळे देशाची

Read More
Latest NewsPUNE

पुणेरी, काश्मिरी तरूणाई थिरकली उषा उत्थुप यांच्या गाण्यांवर ..

पुणे : त्या आल्या, त्या गायल्या आणि तरुणाई थिरकली.. वितस्था महोत्सवात. महोत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात हिंदी, मराठी, काश्मिरी–डोगरी गाणी सादर करून प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांनी पुणेकरांवर सुरांची मोहिनी घातली.  आझादी का अमृत महोत्सवांतर्गत केंद्र सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित वितस्था (काश्मीर) महोत्सव एमआयटी पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड परिसरात सुरू आहे. उषा उत्थुप यांनी ‘जाने जा‘, ‘दम मारो दम‘, ‘नाटू नाटू‘ या गाण्यांबरोबरच ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकिन है‘ असे सांगत तरुणाईला आपलेसे केले. डॉन म्हणजे आपला भारत देश आहे असे सांगून रसिकांची मने जिंकली. दुनिया मे लोगों को, मोनिका, आ देखे जरा, जिते है शानसे, रंभा हो, हरी ओम हरी या प्रसिद्ध गाण्यांसह काश्मिरी, डोगरी गीते सादर करत पूर्ण मैफलीचा माहोल बदलून टाकला. पुणेकरांच्या आग्रहास्तव ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं‘ या मराठी गाण्याने दादा कोंडकेच्या आठवणी जागविल्या. नाटू नाटू गाण्याने युवा पिढीने स्टेजवर एकच दंगा केला. ‘डार्लिंग‘ गाण्याने मैफलीचा समारोप केला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यातील ‘आकार‘ संस्थेच्या बालचमूने सादर केलेल्या राष्ट्रभक्तीपर हिंदी गीतांनी झाला. नवयुग की नवगती नवलय हम, तुम समय की रेत पर (संगीत दिग्दर्शन चित्रा देशपांडे), हम करे राष्ट्र आराधन, सुनो गौरसे दुनियावालो, कंधोंसे मिलते है कंधे, माँ तुझे सलाम या गीतांचा समावेश होता. यासह काश्मिरच्या पारंपरिक लोकगीतांचे सूर ‘वितस्था‘ आसमंतात निनादले. वितस्था नदीच्या प्रवाहाचा स्त्रोत आपली संस्कृती, परंपरा घेऊन या महोत्सवानिमित्तानं महाराष्ट्रात दाखल झाली आहे. विविध प्रकारचे लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य या कलाप्रकारांसह चित्रकलेचा देखील यात समावेश आहे. वाद्य वादनात संतूर, रबाब, सारंगी, तुंबक नारी, सुरनाई (शहनाई), वसूला (ढोल), तबला, नोट (मटका) या पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण काश्मिरी कलाकारांनी केले. संस्कृती प्रवाह ! ‘वितस्था‘ नदीचा प्रवाह केवळ भौगोलिकच नव्हे तर मानवी जीवनाशी निगडित कित्येक प्रकारातून प्रवाहित होतो. तेच प्रतिबिंब कागद, कापड, काष्ठ आदींच्या माध्यमातून उमटविण्याचा प्रयत्न चित्रकला दालनात केला आहे. आठ काश्मिरी कलाकारांसह पुण्यातील चार कलाकारांच्या चित्रकृतींचा यात समावेश आहे.    

Read More
ENTERTAINMENTLatest News

पारगाव पोस्टाची आज अंतिम परीक्षा!

सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ

Read More
BusinessLatest News

गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लक्झरी निवासी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली

पुणे : गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लक्झरी निवासी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली या प्रकल्पामध्ये जवळपास ७.५ लाख चौरस फीट

Read More
BusinessLatest News

आता पुण्यात वाढली सॉलिटारिओची चमक

पुणे – सॉलिटारिओया लक्झरी ब्रॅन्ड कडून सर्वोत्कृष्ट लॅब मध्ये तयार करण्यात आलेल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या हिर्‍यांची विक्री केली जात असून त्यांनी आज

Read More