Tuesday, September 1, 2026
Latest NewsSports

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब, इऑन वॉरीयर्स संघांची विजयी कामगिरी !!

चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

पुणे :  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब आणि इऑन वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उत्कर्ष चौधरी याच्या ४९ धावांच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने वालेकर स्पोर्ट्सचा ६४ धावांनी पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १९९ धावा धावफलकावर लावल्या. उत्कर्ष चौधरी (४९ धावा), मोहम्मद ताहीर (४४ धावा) आणि मनिष शेजवाल (४२ धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानासमोर वालेकर स्पोर्ट्सचा डाव १३५ धावांवर मर्यादित राहीला. ग्लोबल संघाच्या अजय पाटील (३-११) आणि गणेश जोशी (२-२२) यांनी चमकदार गोलंदाजी केली.

कश्पय बाकळे याच्या अर्धशतकी खेळीमुळे इऑन वॉरीयर्स संघाने औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इऑन वॉरीयर्सने २०९ धावांचा डोंगर उभा केला. कश्यप बाकळे (५७ धावा), वीर यादव (३६ धावा), मयांक कश्यप (नाबाद ३८ धावा) आणि  वैभव लवांडे (२८ धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १४३ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद १९९ धावा (उत्कर्ष चौधरी ४९, मोहम्मद ताहीर ४४, मनिष शेजवाल ४२, दर्शन दातिर ३-३९) वि.वि. वालेकर स्पोर्ट्सः १९.२ षटकात १० गडी बाद १३५ धावा (विलास दुधाणे ४३, श्रेयस खाडे १८, अजय पाटील ३-११, गणेश जोशी २-२२); सामनावीरः उत्कर्ष चौधरी;

इऑन वॉरीयर्सः १९ षटकात ६ गडी बाद २०९ धावा (कश्यप बाकळे ५७ (३३, ६ चौकार, ४ षटकार), वीर यादव ३६, मयांक कश्यप नाबाद ३८, वैभव लवांडे २८, महेश दसपुते २-४५) वि.वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९ षटकात ९ गडी बाद १४३ धावा (भुषण नवांडे ३६, अभिजीत भगत २९, नचिकेत वेरलेकर २-७, अर्थव वारणे २-७); सामनावीरः कश्यप बाकळे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading