आता पुण्यात वाढली सॉलिटारिओची चमक
पुणे – सॉलिटारिओया लक्झरी ब्रॅन्ड कडून सर्वोत्कृष्ट लॅब मध्ये तयार करण्यात आलेल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या हिर्यांची विक्री केली जात असून त्यांनी आज पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटी मॉल मध्ये त्यांच्या नवीन स्टोअरची सुरुवात केली. हा ब्रॅन्ड लॅब मध्ये तयार करण्यात येणार्या हिर्यांच्या बाजारपेठेतील नामवंत ब्रॅन्ड असून या ब्रॅन्डची सुरुवात प्रसिध्द बॉलिवूड नट आणि निर्माते विवेक आनंद ओबेरॉय यांनी केली असून त्यांच्या हस्ते स्टोअर ची सुरुवात करण्यात आली. या शाही सोहळ्याच्या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ओबेरॉय यांच्या सह त्यांचे सहसंस्थापक श्री विकी वसनंदानी आणि श्री सतीश दर्यनानी यांचा समावेश होता.
लॅब मध्ये तयार केलेले हिरे हे अतिशय नियंत्रित वातावरणात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त प्रक्रियांसह तयार करण्यात येत असून या प्रक्रिया म्हणजे जसे हिरे पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक पध्दतीने तयार केले जातात. सॉलेटिॲरो कडून उच्च गुणवत्तेने युक्त दागिने हे वाजवी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येत असून त्याला पर्याय म्हणजे लॅब मध्ये तयार केलेले हिरे हा उत्तम पर्याय आहे. हे हिरे अतिशय कौशल्याने योग्य चमक आणि अचूकतेने तयार कलेले असून त्यांना इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) कडून गुणवत्तेचे प्रमाणन प्राप्त झाले आहे. लॅब मध्ये तयार झालेले असले तरीही हे हिरे नैसर्गिक हिर्यांप्रमाणेच चमकतात आणि ते किंमतीतही परवडणारे असतात.
या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रसिध्द बॉलिवूड कलाकार, निर्माते आणि सॉलिटारिओचे सह संस्थापक विवेक आनंद ओबेरॉय यांनी सांगितले “ या सुरुवातीचा भाग होतांना मला आनंद होत आहे, आता पुण्यातील लोकांना जीवनशैलीत सुधारणा करण्याची एक अनोखी संधी प्राप्त होणार असून त्यायोगे नाविन्यपूर्ण हिर्यांच्या तंत्रज्ञाना बरोबर रोजची आकर्षक डिझाईन्स प्राप्त होऊ शकतील. आमचा असा विश्वास आहे की प्रत्येकाला सुंदर दिसण्या बरोबरच उच्च गुणवत्तेचे हिरे परवडणार्या दरात प्राप्त करण्याचा अधिकार आहे आणि सॉलिटारिओहे स्वप्न सत्यात उतरवण्यास वचनबध्द आहे.”
पुण्यातील स्टोअर मध्ये लॅब मध्ये तयार करण्यात आलेल्या आकर्षक हिर्यांचे दागिने विशेष करुन महिलांसाठी कानातले आणि पेंडंट्स तर पुरुषांसाठी ट्रेन्डी ज्वेलरीचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.
“ सॉलिटारिओमध्ये आमचे लक्ष्य हे आहे की ग्राहकांना परवडणार्या दरात आणि सर्वोत्कृष्ट गुणवत्तेशी तडजोड न करता हिर्यांचे दागिने उपलब्ध करुन देणे.” असे सॉलिटारिओचे सह संस्थापक आणि सीईओ रिकी वसनंदानी यांनी सांगितले “आमच्या ब्रॅन्डच्या माध्यमातून आम्ही लोकांना लॅब मधील हिर्यां विषयी माहिती करुन त्यांचा अनुभव देऊ करत आहोत. ज्वेलरी क्षेत्रात आम्ही नवीन आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्याकरता आम्ही खूपच उत्साही असून त्याच बरोबर आम्ही नैतिक. परवडणारे आणि आकर्षक असे दागिने नैसर्गिक हिर्यांना पर्याय म्हणून उपलब्ध करुन देत आहोत. आंम्हाला हे नमूद करतांना आनंद होतो की हे लॅब मधील हिरे संपूर्णत: भारतात बनलेले म्हणजेच कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनापर्यंत भारतात तयार झालेले आहेत.” ते पुढे म्हणाले.
सध्या सॉलिटारिओची उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपात स्टोअर्स आहेत. त्यांची संपूर्णत: सक्षम अशी हिर्यांना पैलू पाडण्याची फॅक्टरी भारतातील पुण्यात असून त्यांची भारतातील स्टोअर्स पुणे, गोवा आणि लुधियाना येथे आहेत. त्यांनी याच स्टोअर्सचा विस्तार संपूर्ण भारतात करण्याचीही योजना आखली आहे. सॉलिटारिओच्या वाढीच्या योजना अतिशय वेगाने प्रगती करत असून ब्रॅन्ड ने सुध्दा येत्या तिमाहीत मेना क्षेत्रात वाढ करण्याची योजना आखली आहे.