fbpx

गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लक्झरी निवासी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली

पुणे : गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लक्झरी निवासी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली या प्रकल्पामध्ये जवळपास ७.५ लाख चौरस फीट जागा विकसित करण्याची क्षमता असेल आणि यामधून जवळपास १००० कोटी रुपये महसूल मिळेल असे अनुमान आहे.

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासक कंपन्यांपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: GODREJPROP) आज घोषणा केली की त्यांनी पुण्यातील उच्चभ्रू व महाग निवासी भाग असलेल्या कोरेगाव पार्कच्या जवळ ~४ एकर जमीन अधिग्रहित केली आहे. याठिकाणी प्रामुख्याने आलिशान समूह गृह प्रकल्प विकसित केला जाईल.

कोरेगाव पार्कमध्ये सर्व भौतिक व सामाजिक पायाभूत सोयीसुविधा आधीपासून उपलब्ध आहेत. इथून पुणे शहरातील सर्व महत्त्वाच्या सामाजिक व व्यापारीव्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अगदी सहज पोहोचता येते.

गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी व सीईओ गौरव पांडेय यांनी सांगितले, “पुण्यातील एका सर्वाधिक प्रीमियम ठिकाणी जमीन अधिग्रहित केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात आलिशान रियल्टीची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुणे शहरात हे आमचे पहिलेच आलिशान विकासकाम असणार आहे. सर्वोत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण निवासी समुदाय उभारणे हे आमचे लक्ष्य आहेजो त्याठिकाणच्या रहिवाशांना दीर्घकाळपर्यंत मूल्य प्रदान करत राहील.”

Leave a Reply

%d bloggers like this: