Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

पुणेरी, काश्मिरी तरूणाई थिरकली उषा उत्थुप यांच्या गाण्यांवर ..

पुणे : त्या आल्यात्या गायल्या आणि तरुणाई थिरकली.. वितस्था महोत्सवातमहोत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात हिंदीमराठीकाश्मिरीडोगरी गाणी सादर करून प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांनी पुणेकरांवर सुरांची मोहिनी घातली

आझादी का अमृत महोत्सवांतर्गत केंद्र सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित वितस्था (काश्मीरमहोत्सव एमआयटी पीस युनिव्हर्सिटीकोथरूड परिसरात सुरू आहे.

उषा उत्थुप यांनी ‘जाने जा‘, ‘दम मारो दम‘, ‘नाटू नाटू‘ या गाण्यांबरोबरच ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकिन है‘ असे सांगत तरुणाईला आपलेसे केलेडॉन म्हणजे आपला भारत देश आहे असे सांगून रसिकांची मने जिंकलीदुनिया मे लोगों कोमोनिका देखे जराजिते है शानसेरंभा होहरी ओम हरी या प्रसिद्ध गाण्यांसह काश्मिरीडोगरी गीते सादर करत पूर्ण मैफलीचा माहोल बदलून टाकलापुणेकरांच्या आग्रहास्तव ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं‘ या मराठी गाण्याने दादा कोंडकेच्या आठवणी जागविल्यानाटू नाटू गाण्याने युवा पिढीने स्टेजवर एकच दंगा केला. ‘डार्लिंग‘ गाण्याने मैफलीचा समारोप केला.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यातील ‘आकार‘ संस्थेच्या बालचमूने सादर केलेल्या राष्ट्रभक्तीपर हिंदी गीतांनी झालानवयुग की नवगती नवलय हमतुम समय की रेत पर (संगीत दिग्दर्शन चित्रा देशपांडे), हम करे राष्ट्र आराधनसुनो गौरसे दुनियावालोकंधोंसे मिलते है कंधेमाँ तुझे सलाम या गीतांचा समावेश होतायासह काश्मिरच्या पारंपरिक लोकगीतांचे सूर ‘वितस्था‘ आसमंतात निनादले.

वितस्था नदीच्या प्रवाहाचा स्त्रोत आपली संस्कृतीपरंपरा घेऊन या महोत्सवानिमित्तानं महाराष्ट्रात दाखल झाली आहेविविध प्रकारचे लोकसंगीतलोकनृत्यलोकनाट्य या कलाप्रकारांसह चित्रकलेचा देखील यात समावेश आहेवाद्य वादनात संतूररबाबसारंगीतुंबक नारीसुरनाई (शहनाई), वसूला (ढोल), तबलानोट (मटकाया पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण काश्मिरी कलाकारांनी केले.

संस्कृती प्रवाह !

वितस्था‘ नदीचा प्रवाह केवळ भौगोलिकच नव्हे तर मानवी जीवनाशी निगडित कित्येक प्रकारातून प्रवाहित होतोतेच प्रतिबिंब कागदकापडकाष्ठ आदींच्या माध्यमातून उमटविण्याचा प्रयत्न चित्रकला दालनात केला आहेआठ काश्मिरी कलाकारांसह पुण्यातील चार कलाकारांच्या चित्रकृतींचा यात समावेश आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading