…तर सावरकरांना भारतरत्न द्या – अजित पवार यांचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर : महाविकासआघाडीची सभा होऊ नये म्हणून. महत्त्वाचे प्रश्न समोर येऊ नये म्हणून हे उद्योग आहेत. उद्योग येणार नाहीत, कोरोनामधून राज्याला बाहेर काढलं, न्यायालयाने कौतुक केलं. एकाच हातात घड्याळ घालून मशाल घेता येते. ही वज्रमठू आपल्याला टिकवायची आहे, ही शपथ घेऊन बाहेर पडू,’ ‘तुमच्यात धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, आहे तुमच्यात हिंमत? असे आव्हान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले.
महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेदरम्यान भाषण करताना अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसंच महाविकासआघाडी सरकार का स्थापन करण्यात आलं, याचं कारणही सांगितलं. आपण एकत्र का आलो? यासाठी सभा घेणार होतो. मात्र कोरोना आला, त्यामुळे शक्य झालं नाही. नंतर अशी घटना घडली पाय उतार व्हावं लागलं. आपल्याला राज्यात अशा सभा घ्यायच्या आहेत. राज्यात जेव्हा असं संकट येतं तेव्हा मराठी माणूस पेटून उठतो, येणाऱ्या निवडणुकीत आपण विजय मिळवू, यात शंका नाही, असं अजित पवार म्हणाले.
‘असा निकाल कधी पाहायला नाही. सरकार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, हे देशाला परवडणारं नाही. उद्योगधंदे येणार नाहीत. प्रशासनदेखील चांगल्यापद्धतीने चालणार नाही. निवडणूक आयोग असा निकाल देत आहे, न्यायदेवता न्याय देईल यात शंका नाही,’ असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
’13 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री निघून गेले. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांची अशी उपेक्षा झाली नव्हती. मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली, 2 दिवस अधिवेशन लावा, यांनी लावलं नाही,’ असा आरोप अजित पवारांनी केला.
‘राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अवमान केला. तेव्हा यांची दातखीळ बसली होती का? गौरव यात्रेला आमचा विरोध नाही, पण दुटप्पी राजकारण तुम्ही करता. सुप्रीम कोर्टाने नपुंसक, शक्तिहीन सरकार आहे, असं म्हणलं आम्ही नाही. यांचा पायगुण चांगला नाही. रोजगार देणारे उद्योग गेले,’ असा निशाणा अजित पवारांनी साधला.
