Saturday, June 20, 2026
PUNE

‘सूर्यदत्ता कॉलेज’च्या ‘बीएस्सी इन सायबर अँड डिजिटल सायन्स’च्या पहिल्या बॅचचे उद्घाटन

पुणे: ‘‘संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, बँकिंग, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे. मोठ्या प्रमाणात माहितीची निर्मिती आणि साठवणूक होते. डेटाचे महत्व वाढले आहे. मात्र, सायबर हल्ले, हॅकर्सकडून होणारी माहितीची चोरी आदींमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. ‘टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रप्शन्स’ रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची आवश्यकता असून, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी इन्स्टिट्यूटमुळे ही गरज पूर्ण होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित पुण्यात हा अभ्यासक्रम सुरु होतोय, याचा आनंद वाटतो,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमाळकर यांनी केले.

सूर्यदत्ता एज्युकेशन फौंडेशन संचालित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी (एसआआयसीएस) अंतर्गत चालणाऱ्या ’बीएस्सी इन सायबर अ‍ॅन्ड डिजिटल सायन्स प्रोग्रॅम’ या 2020-23 च्या पहिल्या तुकडीचा शुभारंभ डॉ. करमळकर यांच्या हस्ते व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे करण्यात आला. प्रसंगी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, गेसिया आयटी असोसिएशनचे सरसचिव अनुपम भटनागर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, कार्यकारी संचालक डॉ. शैलेश कासंडे, प्रा. एस. रामचंद्रन, प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. सुनिल धाडिवाल आदी उपस्थित होते.

डॉ. नितिन करमाळकर म्हणाले, ‘‘प्रस्तावित नवीन शैक्षणिक धोरणातही तंत्रज्ञानाचा वापर करत असताना उद्भवणार्‍या धोक्यांवर उपाय शोधणारे शिक्षण देण्यावर भर दिला आहे. पुण्यात सायबर सुरक्षेसंबंधी विशेष बीएस्सी अभ्यासक्रम सुरु होतोय, हे महत्त्वाचे आहे. सायबर सुरक्षा, डेटा सुरक्षा याबाबत नागरिक अजूनही अनभिज्ञ आहेत. सायबर हल्ले, ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी गरज आहे. या अभ्यासक्रमामुळे आगामी काळात चांगले सायबर तज्ज्ञ निर्माण होतील.’’

एअरमार्शल भूषण गोखले म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाचे फायदे तसे तोटेही आहेत. आज तंत्रज्ञानामुळे कोरोना महामारीच्या संकटातही आपण एकमेकांशी बोलतो आहोत. परंतु, याच इंटरनेटमुळे आपल्याला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. आपल्याकडील महत्वाची माहिती चोरुन हॅकर्स त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे आपल्या माहितीची सुरक्षा महत्वपूर्ण बनत आहे. सायबर हे अदृश्य स्वरूपातील शस्त्र आहे. या शस्त्राला, हल्ल्याला परतवून लावण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ उपलब्ध होणे गरजेचे आहे.’’

अनुपम भटनागर म्हणाले, ‘‘सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे. हॅकर्सचा सामना करण्यासाठी आपल्याला तशा प्रोफेशनल मनुष्यबळाची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. समाजाच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सूर्यदत्ताने घेतलेला हा पुढाकार अतिशय महत्वपूर्ण आहे.’’ प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविकात सायबर इन्स्टिट्यूटच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट केला.
——————
‘सायबर’मध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी
‘‘आपल्या दैनंदिन जीवनात व्यक्तिगत, सामाजिक, संस्थात्मक इतकेच नाही, तर शासकीय व्यवस्था आणि विकासातही तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे. डिजिटायझेशन, डिजिटल वर्ल्ड हे शब्द रोजचे झाले आहेत. जगभरात लोकसंख्येपेक्षा डिजिटल गॅजेट्स वापरणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. भारत सर्वच आघाड्यांवर डिजिटल बनण्याला प्राधान्य देत असून, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी आदी उपक्रम त्याचाच भाग आहे. अशावेळी सायबर सिक्युरिटी अ‍ॅन्ड डिजिटल सायन्समधील प्रशिक्षित लोकांची मोठी आवश्यकता आहे. मात्र, तुलनेने प्रशिक्षित मनुष्यबळ कमी आहे. सायबर हल्ले, हॅकिंग, अनधिकृत वापर यांपासून डिजिटल उपकरणे व माहितीचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षेमध्ये तंत्रज्ञान आणि प्रक्रिया वापरली जात आहे. फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशनच्या इंटरनेट गुन्हे अहवालानुसार इंटरनेटद्वारे होणार्‍या हल्ल्यांमध्ये भारत जगात तिसर्‍या स्थानावर आहे. सायबर सुरक्षेमध्ये जागतिक स्तरावर 2021 पर्यंत 35 लाख रोजगार उपलब्ध होतील, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहेत. हॅकिंग आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी हुशार लोकांची गरज असून, आज भारतात जवळपास 30 हजार सायबर तज्ज्ञांचा जागा रिक्त आहेत. ”
– प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

कोणकोणते अभ्यासक्रम
‘एसआयआयसीएस’मार्फत विद्यार्थ्यांना कंप्युटर सायन्स व प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कंप्युटिंग डिव्हाइसेस, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स इन कंप्युटर सायन्स, सी प्रोग्रमिंग, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कंप्युटर नेटवर्क्स, एथिकल हॅकिंग, वेब डिझाइनिंग, पायथॉन प्रोग्रामिंग, डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टिम, डेटा स्ट्रक्चर्स, एन्व्हायर्नमेंट सायन्स, सॉफ्ट स्किल्स आदी गोष्टी अभ्यासता येणार आहेत.

करिअरच्या संधी
या अभ्यासक्रमानंतर रोजगाराच्या, व्यावसायाच्या अनेक संधी उपलबध आहेत. शासकीय संस्थांमध्येही मोठे मनुष्यबळ लागणार आहे. चीफ इन्फर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, आयटी डायरेक्टर, आयटी सिक्युरिटी डायरेक्टर, आयटी मॅनेजर, आयटी सिक्युरिटी मॅनेजर, सिक्युरिटी आर्किटेक्ट/इंजिनिअर, सिक्युरिटी स्पेशालिस्ट, सिक्युरिटी कन्सल्टंट/सल्लागार, सुरक्षा विश्लेषक, सुरक्षा अधिकारी, सुरक्षा प्रशासक, अप्लिकेशन डेव्हलपर अशा विविध पदांचे रोजगार उपलब्ध होणार आहेत. बीएस्सी सायबर अ‍ॅन्ड डिजिटल सायन्सच्या विद्यार्थ्याला सुरक्षा प्रणालीमध्ये, सुरक्षा प्रशासनामध्ये, रिस्क असेसमेंट, अनॅलिसिस अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, गव्हर्नन्स, क्लाऊट कंप्युटिंग सिक्युरिटी, थ्रेट इंटेलिजन्स, पेनेट्रेशन टेस्टिंग, इंट्रुजन डिटेक्शन, नेटवर्क मॉनिटरिंग, फॉरेन्सिक आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

विविध संस्थांचे प्रामाणिकरण
नव्याने उद्भवत असलेले धोके आणि बदलत असलेले तंत्रज्ञान याला अनुसरुन सतत सुधारत राहणारा हा अभ्यासक्रम व्यावसायिकदृष्ट्या प्रामाणित आहे. सर्टिफाइड इन्फरमेशन सिस्टिम्स ऑडिटर (सीआयएसए), सर्टिफाइड क्लाउड सिक्युरिटी प्रोफेशनल (सीसीएसपी), सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएट (सीसीएनए), सर्टिफाइड एथिकल हॅकर (सीईएच), सर्टिफाइद इन्फर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर (सीआयएसएम), सर्टिफाइड इन्फर्मेशन सिस्टिम्स सिक्युरिटी प्रोफेशनल (सीआयएसएसपी), ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी सर्टिफाइड प्रोफेशनल (ओएससीपी), चीफ इन्फर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर (सीआयएसओ), कंप्युटर हॅकिंग फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेटर (सीएचएफआय), जीआयएसी सिक्युरिटी एसेन्सिएल्स (जीएसईसी), सर्टिफाइड इन रिस्क अ‍ॅन्ड इंटरनॅशन्सल सिस्टिम्स कंट्रोल (सीआरआयएससी) आदी संस्थांकडून हा अभ्यासक्रम प्रामाणित असणार आहे.

सल्लागार मंडळ
‘एसआयआयसीएस’च्या सल्लागार मंडळावर औद्योगिक, शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान, सनदी अधिकारी आणि धोरणात्मक निर्णय घेणारे तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. त्यामध्ये लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रेय शेकटकर, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपुर, सायबर कायद्याचे अभ्यासक अ‍ॅड. राजस पिंगळे, सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ संदीप गादिया, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा, सायबर लॉ सोल्युशनच्या अ‍ॅड. जयश्री नांगरे, उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. प्रथमेश भांगाडे, अ‍ॅड. प्रीती काळे यांचा समावेश आहे.

प्रवेशाची पात्रता
‘बीएस्सी सायबर अ‍ॅन्ड डिजिटल सायन्स’ या अभ्यासक्रमासाठी उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (बारावी), तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा एमसीव्हीसी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेशासंबंधी सर्व माहितीसाठी http://www.siics.org/www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 9763266829 या क्रमांकावर किंवा admission@suryadatta.edu.in या इमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading