Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENT

गॅझेट गुरू गणेशा या कॉसमॉस-मायाच्या नवीन शोसह गणेशोत्सव साजरा करा

कॉसमॉस-माया या आशियातील आघाडीच्या तसेच मोटू पतलु आणि सेल्फी विथ बजरंगी यांसारख्या भारतातील काही सर्वांत यशस्वी अॅनिमेटेड मालिका तयार करणा-या अँनिमेशन स्टुडिओने आपला नवीन होम-ग्रोन अॅनिमेशन शो गॅझेट गुरू गणेशा २२ ऑगस्ट २०२० रोजी सुरू केला आहे. हा शो डिस्ने चॅनेल इंडियावर प्रसारित होणार आहे. हा शो बापू आणि गुड्डू यांच्यासोबत झी5 वरही स्ट्रीम केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून हा शो सुरू करण्यात आला आहे.

गजबज आणि भव्य साजरीकरणासाठी ओळखल्या जाणा-या या उत्सवावर गेल्या अनेक वर्षांत प्रथमच लॉकडाउनची छाया पडली आहे आणि लोक आपल्या घराच्या सुरक्षित वातावरणातच गणेशोत्सव साजरा करत आहेत. कॉसमॉस मायाने आपल्या अॅनिमेटेड मालिकेच्या माध्यमातून गणपतीबाप्पाला टेक्नो-सॅव्ही अवतारात सर्वांच्या घरी पोहोचवले आहे. भारताची वैशिष्ट्यपूर्ण खासियत आणि जागतिक संवेदनशीलता यांचा मेळ साधणा-या अॅनिमेटेड मालिका तयार करण्यासाठी ओळखल्या जाणा-या कॉसमॉस मायाच्या या नवीन शोमध्ये भारतीय संस्कृतीच्या सुरेख पार्श्वभूमीवर घडणा-या विनोदाचा शिडकावा आहे. गॅझेट गुरू गणेशामध्ये गुरू हा सात वर्षांचा बुद्धिमान मुलगा आणि नवोन्मेषकारी गॅझेट्स असलेला त्याचा सॉफ्ट टॉय गणेश आहे. गणेशाच्या मदतीने गुरू आणि त्याचे मित्र दैनंदिन समस्या हाताळताना काही हलवून टाकणा-या अनुभवांतून जातात.

गणपतीवर लहान मुले आणि मोठे सारखेच प्रेम करतात. धीरज बेरी दिग्दर्शित ही मालिका सर्व सीमा व भौगोलिक प्रदेशातील लहान मुलांपुढे, ती ज्या काळात जगत आहेत, त्या काळाशी सुसंगत पद्धतीने आणि त्यांच्या भाषेत भारतीय संस्कृती व परंपरा जिवंत करते. या शोच्या माध्यमातून  मुलांना गॅझेट गुरू गणेशाच्या रूपात एक मित्र सापडेल आणि त्याच उत्साहात ते घरात ११ दिवसांचा उत्सव साजरा करतील, अशी आशा टीमला वाटत आहे. 

कॉसमॉस-मायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश मेहता या शोच्या लाँचबद्दल म्हणाले, “कॉसमॉस मायामध्ये आम्ही कायम प्रेक्षकांशी सहजपणे बोलू शकतील आणि नाविन्य व परिचय यांच्या मूल्यांमधून मनोरंजन करू शकतील अशा कथा तयार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. लहान मुलांसाठी कंटेण्ट निर्माण करताना आम्ही याची विशेष काळजी घेतो. या शोमधील दोन घटक मुलांना फार आवडतात- गॅझेट्स आणि श्रीगणेश. गणपतीची मूर्ती बहुतेक सर्व भारतीय घरांमध्ये असते आणि प्रत्येक मुलाला त्याच्याशी मैत्री करायची असते. सर्वांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि कल्याण व मित्रत्वाचे बंध साजरा करणारा, कपोकल्पित (फँटसी) तरीही आपल्या आयुष्याशी जोडलेला हा शो आम्ही तयार केला आहे. आमचे हे नवीन उत्पादन डिस्ने चॅनल इंडियाच्या माध्यमातून सर्वांपुढे आणताना आम्हाला खूप उत्साह वाटत आहे. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल या वाहिनीचे आम्ही आभारी आहोत. लहान मुलांनी पोगोवरील टिटूसारख्या नवीन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे हे वर्ष आमच्यासाठी चांगले गेले आणि टर्नरशी भागीदारी करून आम्ही प्रदर्शित करत असलेल्या लंबुजी टिंगुजी या आगामी शोलाही असाच प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

सृजनात्मक विकास व वर्तमान प्रकल्प विभागाचे एसव्हीपी तसेच या शोचे दिग्दर्शक धीरज बेरी म्हणाले, “श्रीगणेश हे आपल्याला अडथळ्यांशी लढण्यात मदत करणारे दैवत म्हणून ओळखले जाते. सध्या लहान मुले दुर्दैवी काळात अडकली आहे. शाळेत जाणे आणि मित्रांसोबत खेळणे याचा आनंद त्यांच्यापासून हिरावला गेला आहे. गॅझेट गुरू गणेशसारखा मित्र आपल्या आयुष्यात असावा अशी सगळ्याच मुलांची इच्छा असेल. कधीच न हरण्याचे चैतन्य हा गणेश मुलांना उपकरणांच्या माध्यमातून देतो. या शोमध्ये काही कपोकल्पित घटना होतात. गुरू त्याचा मित्र गणेश व त्याच्या उपकरणांच्या मदतीने या विलक्षण घटनांमधून त्याचा मार्ग काढतो. हे प्रत्येक मुलाच्या विस्तीर्ण कल्पनाशक्तीला वंदन आहे. मजेशीर पद्धतीने सामाजिक मूल्ये मुलांच्या मनात अॅनिमेशनच्या माध्यमातून रुजवण्याचा हा प्रयत्न आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading