Monday, August 31, 2026
PUNE

आदिवासी, ग्रामीण कलाकार निर्मित गणेश प्रतिमा ,कलावस्तूचे ‘ट्राईब छत्री ‘ कलादालनात १२ ऑगस्ट पासून प्रदर्शन

पुणे, दि. 11 – भारतातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकार निर्मित गणेश प्रतिमा ,कलावस्तू चे प्रदर्शन’ ट्राईब छत्री ‘ कलादालनात 12ऑगस्ट पासून भरविण्यात येणार आहे .पर्वती पायथा ,महिला मंडळ येथे असलेल्या ‘ट्राईब छत्री’ कलादालनाच्या संचालिका पूर्वा परांजपे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

भारतातील विविध भागांतील गणपती प्रतिमा आणि त्याच्याशी निगडित कलाकुसरीच्या वस्तू, भेट वस्तू , सजावटीसाठीच्या वस्तू हे सर्व एका ठिकाणी पाहता येणार आहेत . राजस्थानातील टेराकोटा च्या गणेशमूर्ती ,ओडिशातील आदिवासींनी तयार केलेली पाम वृक्षापासून केलेले गणेश प्रतिमा रंगविलेले बुक मार्क ,राजस्थानातील आदिवासींनी केलेले धातूंच्या सफेत गणेशमूर्ती ,पट्ट चित्र प्रकारातील गणेश प्रतिमांचे पेंटिंग ,पश्चिम बंगाल च्या कलाकारांनी कागद आणि ज्यूट(ताग ) पासून केलेल्या गणेश प्रतिमांच्या कलावस्तू हे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे . ओडिशतील आदिवासींनी तांदुळाच्या साळीपासून बनवलेल्या गणेश प्रतिमा ज्या पर्यावरण पूरक आहेत हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

12ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे . सकाळी ११ ते २, सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी या प्रदर्शनाची वेळ आहे . प्रवेश विनामूल्य आहे ,मात्र कलावस्तू हव्या असल्यास त्या थेट कलाकारांकडून विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . ‘ट्राइब छतरी ‘ हे केंद्र शासन मान्यताप्राप्त आदिवासी कलावस्तू दालन आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading