Sunday, September 6, 2026
PUNE

पुणे विभाग- 1 लाख 84 हजार 382 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 2 लाख 50 हजार 650 रुग्ण -विभागीय आयुक्त

पुणे,दि.03 :- पुणे विभागातील 1 लाख 84 हजार 382 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 50 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 596 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 672 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.56 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 282 रुग्णांपैकी 1 लाख 37 हजार 638 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 498 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.64 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 247 रुग्णांपैकी 8 हजार 151 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 666 आहे. कोरोनाबाधित एकूण 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 882 रुग्णांपैकी 14 हजार 242 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 871 आहे. कोरोनाबाधित एकूण 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 897 रुग्णांपैकी 7 हजार 927 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 428 आहे. कोरोनाबाधित एकूण 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 342 रुग्णांपैकी 16 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 133 आहे. कोरोनाबाधित एकूण 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 151 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 535, सातारा जिल्ह्यात 589 , सोलापूर जिल्ह्यात 456 , सांगली जिल्ह्यात 735 तर कोल्हापूर जिल्ह्यात 836 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 11 लाख 81 हजार 138 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 50 हजार 650 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading