Thursday, July 2, 2026
BusinessLatest News

‘इन्व्हेस्को म्युच्युअल फंड’कडून समिट इक्विटी लाँग-शॉर्ट फंड लाँच

मुंबई : इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने आज समिट एसआयएफ ब्रँड नावाखाली स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) श्रेणीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. या श्रेणीतील आपल्या प्रवेशाची नोंद करत कंपनीने त्यांचे पहिले एसआयएफ गुंतवणूक धोरण समिट इक्विटी लाँग-शॉर्ट फंडच्‍या लाँचची घोषणा केली. (हे ओपन-एंडेड इक्विटी गुंतवणूक धोरण आहे, जे सूचीबद्ध समभागांमध्ये आणि डेरिव्हेटिव्ह साधनांद्वारे इक्विटीमध्ये मर्यादित शॉर्ट पोझिशन घेण्यासह इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करते).

समिट इक्विटी लाँग-शॉर्ट फंड लाँग पोझिशन्सच्या माध्यमातून बाजारपेठेतील वाढीचा आणि शॉर्ट पोझिशन्सच्या माध्यमातून बाजारपेठेतील घसरणीच्या धोरणात्मक संधींचा फायदा घेण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या धोरणामधून समिट एसआयएफचे मूळ तत्वज्ञान दिसून येते, ते म्‍हणजे बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेत अल्फा (अतिरिक्त परतावा) मिळवणे.

पोर्टफोलिओला अधिक दृढ करण्यासाठी हे गुंतवणूक धोरण दोन वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणेल. पहिले म्‍हणजे, इन्व्हेस्को अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया)च्या वर्गीकरण संरचनेवर आधारित बॉटम-अप (तळापासून वरच्या पातळीवर) समभाग निवड प्रक्रियेद्वारे चालवले जाणारे डायरेक्शनल लाँग धोरण; आणि दुसरे, सुमार कामगिरीची शक्यता असलेल्या समभागांमधील घसरणीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने डेरिव्हेटिव्ह्जद्वारे घेतलेले टॅक्टिकल शॉर्ट पोझिशन धोरण. या गुंतवणूक धोरणाचे व्यवस्थापन  हितेन जैन यांच्याद्वारे केले जाईल आणि या फंडासाठी बीएसई ५०० टीआरआय हा बेंचमार्क (प्रमाणक) असेल.

या लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत इन्व्हेस्को अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. सौरभ नानावटी म्हणाले, “आम्ही भारतातील मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रामध्‍ये एका महत्त्वपूर्ण वळणावर आहोत. एसआयएफ श्रेणी अनुभवी गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये स्थिरता प्रदान करते, जी यापूर्वी केवळ संस्थात्मक भांडवलापुरती मर्यादित होती. भारतामधील पुढील पिढीतील संपत्ती निर्माण करणाऱ्यांसाठी विशेष गुंतवणूक विचार पद्धती उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता समिट एसआयएफच्या माध्यमातून दिसून येते.”

इन्व्हेस्को म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर  हितेन जैन पुढे म्हणाले, “आजच्या गतिमान बाजारपेठेत अल्फा (अतिरिक्त परतावा) मिळवणे म्हणजे केवळ बाजारपेठेच्या प्रवाहावर स्वार होणे नव्हे, तर संधी आणि जोखीम या दोन्हीचा योग्य ताळमेळ राखणे होय. समकालीन लाँग-ओन्ली (फक्त खरेदी करणारे) फंड केवळ शेअर्सच्या किमती वाढतात तेव्हाच पैसे कमवू शकतात. पण, बाजारपेठेतून मिळणारा परतावा हा मूळतः सलग नसतो आणि त्यात वेळोवेळी चढ-उतार येत असतात. समिट इक्विटी लाँग-शॉर्ट फंड लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही संधींचा लाभ घेण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामुळे बाजारपेठेतील अस्थिरता आणि बदलत्या संधींचा प्रभावीपणे फायदा उठवणे शक्य होते.”

एनएफओ कालावधीत किमान गुंतवणुकीची रक्कम १०,००,००० रूपये आहे आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. पात्र गुंतवणूकदारांच्या बाबतीत, एनएफओदरम्यान किमान गुंतवणुकीची रक्कम १,००,००० रूपये आहे आणि त्यानंतर १ रूपया च्या पटीत गुंतवणूक करता येईल. एसआयपी गुंतवणुकीसाठी, किमान अर्जाची रक्कम १,००० रूपये आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत असेल. पण, यासाठी समिट एसआयएफच्या सर्व गुंतवणूक धोरणांमध्ये मिळून १०,००,००० रूपयांची किमान गुंतवणुकीची मर्यादा राखणे बंधनकारक राहील.

या गुंतवणूक धोरणामध्ये युनिट्सचे वाटप झाल्याच्या तारखेपासून ३ महिने किंवा त्यापूर्वी युनिट्स रिडीम किंवा स्विच-आऊट केल्यास ०.५० टक्‍के एक्झिट लोड आकारला जाईल. ३ महिन्यांनंतर युनिट्स रिडीम किंवा स्विच-आऊट केल्यास कोणताही एक्झिट लोड आकारला जाणार नाही.

हा न्यू फंड ऑफर (एनफएफओ) गुंतवणुकीसाठी आजपासून (२ जुलै २०२६) खुला झाला आहे आणि १६ जुलै २०२६ रोजी बंद होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading