Thursday, July 2, 2026
BusinessLatest News

एचएमएचकडून पुण्‍यातील ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचा विस्तार

पुणे के-१२ शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी एचएमएचने आज पुण्यातील आपल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या (जीसीसी) विस्ताराची घोषणा केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सकारात्मक परिणाम निर्माण करण्याच्या उद्देशाने हे सेंटर सातत्याने प्रगती आणि विकास करत आहे आणि आता नवीन व मोठ्या कार्यालयात स्थलांतरित होत आहे.

पुण्यातील शिवाजीनगर येथील हे नवीन कार्यालय आता सुरू झाले असून २४,००० चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. यामध्ये २३० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आसनक्षमता, कोलाबोरेटिव्ह (एकत्रित काम करण्यासाठी) आणि हायब्रीड वर्कस्पेसेस, तसेच भविष्यातील वाढीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. यामुळे पुणे टीमला नवीन प्राधान्यक्रम आणि संधींवर काम करण्यासाठी आवश्यक जागा आणि पायाभूत सुविधा मिळणार आहेत.

“आमच्या पुणे सेंटरची यशोगाथा प्रत्यक्षात एकात्मिक सहयोगाची कथा आहे. गेली अनेक वर्षे आम्ही अत्यंत प्रतिभावान टीम तयार केली आहे, जी गुंतागुंतीच्‍या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये, विभागांमध्ये आणि शाखांमध्ये उत्तम समन्वय राखून काम करते. आमचे नवीन डिझाइन केलेले कार्यालय अधिक चांगला संपर्क, सर्जनशीलता आणि सांघिक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हे कार्यालय व्‍यक्तींना प्रभावीपणे एकत्र काम करण्यासाठी आणि जगभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांकरिता प्रभावी शैक्षणिक सोल्यूशन्स विकसित करत राहण्यासाठी उत्तम वातावरण प्रदान करेल,” असे एचएमएच टेक इंडियाच्‍या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्‍या एसव्‍हीपी (सीनियर व्हाईस-प्रेसिडेंट) आणि कंट्री मॅनेजर जया वाधवानी म्‍हणाल्‍या.

या विस्ताराच्या मागे सेंटरची झालेली वेगवान वाढ हे मुख्य कारण आहे: तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक्सलन्स सेंटर म्हणून मे २०२३ मध्ये सुरू झाल्यापासून पुणे टीमने गेल्या तीन वर्षांत शून्यावरून थेट ३०० कर्मचाऱ्यांचा टप्पा गाठला आहे. याच वेगवान वाढीमुळे सातत्यपूर्ण संशोधन आणि सहयोगाला पाठबळ देण्यासाठी मोठ्या कार्यालयाची गरज निर्माण झाली होती.

एचएमएच भारतातील टॅलेंट आणि पुण्यातील तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण परिसंस्‍थेमधील आपली गुंतवणूक वाढवत राहण्याचे नियोजन करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading