Monday, September 28, 2026
BusinessLatest News

कॅरारो इंडियाच्या विस्ताराची घोषणा : उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि हाय-एचपी व इलेक्ट्रिक ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मसाठी ३०० कोटींची गुंतवणूक


भारतीय कृषी यंत्रसामग्री क्षेत्र झपाट्याने विकसित होऊ लागले आहे. ड्राइव्हेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या विभागाने कात टाकली आहे. तंत्रज्ञानाची कास, आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने बदलणारी शेतीपद्धती या घटकांमुळे कृषी यंत्रसामग्री विभाग आता नवी झेप घेत आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध जागतिक कंपनी कॅरारो ग्रुपच्या कॅरोरो इंडियाने आपल्या पुढील वाढीच्या टप्प्याचे धोरण आखले आहे. कॅरारो इंडिया ही कॅरारो कंपनीची भारतीय शाखा आहे. कॅरारो इंडियाने आर्थिक वर्ष २०२७ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून विविध घटकांचा विकास साधला जाईल. यात कंपनीची उत्पादन क्षमता वाढवणे, तांत्रिक नवकल्पनांना वाव देणे, भारतीय कृषी यंत्रीकण क्षेत्रातील वाढत्या मागणीला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देणे हा योजनांचा समावेश आहे.

प्रत्येक वर्षी अंदाजे १०० कोटींची गुंतवणूक नियोजित केली जाईल. या गुंतवणूकीतून उत्पादन क्षमता वाढवणे, सद्यस्थितीतील असेम्ब्ली लाईन्समधील तांत्रिक अडचणी दूर करणे, उत्पादन प्रक्रिया कार्यक्षम करणे तसेच जागतिक ट्रॅक्टर आणि बांधकाम उत्पादक कंपन्यांकडून आगामी प्रकल्पांची तयारी करणे आदी घटकांसाठी केला जाईल. कॅरारो इंडिया महिंद्रा अँण्ड महिंद्रा आणि एस्कॉटर्स कुबोटा यांसारख्या आघाडीच्या मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांना ड्रायव्हट्रेन प्रणालीचा पुरवठा करते.

कॅरारो इंडियाने ५३ एकर भूखंडावरील विस्तीर्ण जागेत मोठा उत्पादन प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या मदतीने कंपनीला नव्या विस्ताराची गरज नाही. उलट या मोठ्या उत्पादन प्रकल्पामुळे कंपनी उत्पादन क्षमता सातत्याने वाढवत आहे. कंपनीकडे गिअर उत्पादन क्षमतेची सुविधा तसेच अत्याधुनिक पेंट प्रणालीही उपलब्ध असल्याने मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यात समर्थता येते. मागणी तसा पुरवठा जलदरित्या उपलब्ध करुन देता येतो. या अत्याधुनिक सुविधांमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकवता येते, शिवाय खर्चातही मोठी बचत होऊन कमालीची कार्यक्षमता येते.

यंदाच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या घडामोडींत तब्बल २ हजार २०० कोटींपर्यंत उत्त्पन्न कमावण्याकडे कंपनीचे लक्ष्य आहे. गेल्या वर्षी हे उत्त्पन्न २०० दशलक्ष युरोएवढे होते. कॅरारो इंडियाने दीर्घकालीन आर्थिक विकासाचे उद्दिष्ट बाळगत आर्थिक वर्ष २०३० पर्यंत वार्षिक उत्त्पन्नात ३ हजार ५०० कोटींपेक्षा जास्त उत्त्पन्न कमावण्याचे निश्चित केले आहे. स्थानिकीरणाची वाढती प्रक्रिया आणि मूळ उत्पादक कंपनी भागीदारांकडून सातत्याने जास्त ऑर्डर्स मिळत असल्याने हे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

देशात चारचाकी ट्रॅक्टरच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रातील वाढीला मोठी चालना मिळत आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, सहा वर्षांपूर्वींच्या ट्रॅक्टर वापराची माहितीची टक्केवारी पाहिल्यास, चारचारी ट्रॅक्टरचा वापर १ ते २ टक्क्यांपुरता मर्यादित होता. आता या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. सध्या चारचाकी ट्रॅक्टरची मागणी थेट २५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. शेतीमधील वाढते यांत्रिकीकरण आणि परदेशातून हाय-हॉर्सपॉवर ट्रॅक्टरसाठी वाढती मागणी या दोन प्रमुख कारणांमुळे हा आर्थिक विकास साधता आला आहे.

कृषी यंत्रसामग्री क्षेत्रात विद्युत उर्जेवर चालणारी यंत्रसामग्रीची मागणी दिवसागणिक वाढू लागली आहे. आर्थिक विकासाचा टप्पा गाठण्यासाठी एक मोठी संधी ठरली आहे. हे लक्ष्य साधण्यासाठी कॅरारो इंडिया कंपनी मुरुगप्पा समूहाचा भाग असलेल्या मॉन्टा इलेक्ट्रिकसोबत भागीदारी करत आहे. नव्या भागीदारीतून भविष्यातील इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक ड्राइव्हलाइन प्रणाली विकसित केली जाईल.

देशातील पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च आणि शेतीच्या बदलत्या गरजा लक्षात घेत कॅरारो इंडियाने आपली गुंतवणूक धोरणे आखली आहेत. उत्पादन क्षमता वाढवण्यासह तांत्रिक कौशल्ये प्रगत करण्यावर कंपनी प्रयत्नशील आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीचा दबदबा कायम राहील. कंपनी उत्तरोत्तर आर्थिक विकासाची नवी उंची गाठण्यस सक्षम ठरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading