Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

वनराई व एसईडब्ल्यू’ने सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळेला बांधून दिल्या वर्गखोल्या व संगणक कक्ष

 

पुणे, प्रतिनिधी :
वनराई संस्था, पुणे व एसईडब्ल्यू युरो ड्राइव्ह कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक चाकण येथे सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अत्याधुनिक संगणक कक्ष आदी पर्यावरणपूरक सुविधा असलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधलेल्या वर्गखोल्यांचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले.

विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात विकासात्मक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने बांधून देण्यात आलेल्या वर्गखोल्यांच्या उदघाट्न प्रसंगी एसईडब्ल्यू युरोड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे इंजिनिअरिंग प्लांट हेड योगेश नांगरे, व्यवस्थापक विलास जाधव, डिमांड हेड मयूर धर्माधिकारी, वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, प्रकल्प प्रमुख राकेश शेलार, जनसंपर्क अधिकारी शशांक गराडे, मुख्याध्यापिका हेमलता देशमुख, मुख्याध्यापिका सारिका पोटे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना योगेश नागरे यांनी सांगितले, की सामाजिक बांधिलकीच्या हेतूने बांधून देण्यात आलेल्या वर्गखोल्या आणि संगणक कक्ष विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी निश्चित उपयोगी ठरेल.
अमित वाडेकर म्हणाले, की या वर्गखोल्या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक आहेत. शंभर वर्ष जुन्या ऐतिहासिक जिल्हा परिषद शाळेला नवीन वर्गखोल्या व संगणक कक्ष दिल्याचा आनंद आहे. गुणवत्तापूर्ण व विकासात्मक शिक्षण मिळण्यास मदत होईल. वनराई संस्थेशी अनेक व्यक्ती, संस्था जोडल्या जात आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
विलास जाधव म्हणाले, यापुढेही आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडणार आहोत. या शाळेचा दर्जा राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. विद्यार्थ्यांना पोषक वातावरण देणे गरजेचे आहे. मयूर धर्माधिकारी यांनी सामाजिक उत्तरदायित्वात पारदर्शकता महत्वाची असते. ती पारदर्शकता वनराई संस्थेत आहे. म्हणून त्यांच्यासोबत हा प्रकल्प उभा केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading