Monday, May 25, 2026
Latest NewsSports

रूद्र वॉरीयर्स संघाला विजेतेपद !!

‌‘लायन्स्‌‍ प्रीमियर लीग‌’ २०२६ खुला गट टेव्‌‍न्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
पुणे :  लायन्स्‌‍ क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ तर्फे आयोजित सोळाव्या ‌‘लायन्स्‌‍ प्रीमियर लीग‌’ २०२६ खुल्या गटाच्या टेव्‌‍न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत संतोषकुमार सांगळे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे रूद्र वॉरीयर्स संघाने साची सुपरकिंग्ज्‌‍ संघाचा ९२ धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना रूद्र वॉरीयर्सने २० षटकात १७५ धावा धावफलकावर लावल्या. कर्णधार संतोषकुमार सांगळे याने ३६ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. साजन मोदी याने दुसऱ्या बाजूने ४७ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना साची सुपरकिंग्ज्‌‍चा डाव ८३ धावांवर गडगडला. समाधान दांडेकर (१५ धावा) आणि राहूल कटके (१४ धावा) यांनी थोडाफार प्रतिकार केला. संतोषकुमार सांगळे याने तीन गडी तर, सनी मारवाडी आणि सचिन थोपटे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण रूद्र मोटर्सचे संतोष माने, लायन्स्‌‍ क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ वाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेंद्र गोयल आणि लायन्स्‌‍ क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ स्पोर्ट्‌‍स चेअरपर्सन ला. श्रीनाथ खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या रूद्र वॉरीयर्स संघाला आणि उपविजेत्या साची सुपरकिंग्ज्‌‍ संघांना करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात आले.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
रूद्र वॉरीयर्सः २० षटकात १० गडी बाद १७५ धावा (संतोषकुमार सांगळे ५१ (३६, ६ चौकार), साजन मोदी ४७, जयराज गौड १८, अनिल मांडके २-३५) वि.वि. साची सुपरकिंग्ज्‌ः २० षटकात ९ गडी बाद ८३ धावा (समाधान दांडेकर १५, राहूल कटके १४, संतोषकुमार सांगळे ३-१४, सनी मारवाडी २-११, सचिन थोपटे २-१२); सामनावीरः संतोषकुमार सांगळे;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः संतोषकुमार सांगळे (१३३ धावा, ८ विकेट, रूद्र वॉरीयर्स);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः सागर जाधव (१८९ धावा, भाऊ कोकणे क्लब);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः साजन मोदी (८ विकेट, रूद्र वॉरीयर्स);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः राहूल बेलसरे (६ बाद, रूद्र वॉरीयर्स);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading