विशेष मुलांच्या रंगपंचमी मध्ये उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सहभाग
पुणे : रंगपंचमी निमित्त भोई प्रतिष्ठानच्या 31 व्या रंगपंचमी उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर सहभागी झाले होते. ही रंगपंचमी पुणे शहरातील अनाथ मुले मूकबधिर रस्त्यावरील गरीब विद्यार्थी अंध मुले, अशा मुला मुलींबरोबर दरवर्षी भोई प्रतिष्ठान होळी उत्सव साजरा करत असते.

या विषयी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, उपमहापौर म्हणून मला निमंत्रित केले होते आणि या सगळ्या मुला मुलींबरोबर रंगपंचमी खेळण्याचा योग आला या सगळ्यांनी मला आनंदाने कलर लावला यामध्ये भगवा , निळा, हिरवा , गुलाबी, पिवळा , नारंगी असे वेगवेगळे रंग सगळे एकमेकांना लावत होते, अशाच पद्धतीने आपला भारत देश आपल्या भारताचे संविधान वेगवेगळ्या रंगाने भरलेले आहे. इथे अनेक संस्थांनी कोणी नाष्टा, कोणी पाणी – जेवण आणले होते त्यामध्ये एका मुस्लिम कुटुंबीयांनी शिरकुरमा आणला होता. वेगवेगळे जाती धर्माचे सगळे एकत्र मिळून हा रंग उत्सव साजरा करत होते हे बघून खूप आनंद वाटला.
या सगळ्या बरोबर हा रंगा उत्सव खेळण्याचा लहानपणाची आठवण झाली खरं म्हणजे जे रंगांपसून वंचित आहेत अशा मुलांना रंग लावून त्यांच्यासोबत होळी खेळण्याची संधी प्राप्त झाली, या कार्यक्रमासाठी खासदार मेधाताई कुलकर्णी ,, स्टॅंडिंग कमिटी चेअरमन श्रीनाथ भिमाले, उद्योजक कृष्णकुमार गोयल , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराकग कळकर यांच्यासह नके मान्यवर उपस्थित होते .
