Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी चाचपणी सुरू

लव्ह जिहादविरोधी कायद्याचा मसुदा सरकारकडे तयार

 

मुंबई प्रतिनिधी

लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी प्रस्तावित कायद्याचा मसुदा सरकारकडे तयार असून त्यावर चर्चा करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या तीन बैठका पार पडल्या असून विधी व न्याय विभागाने कायद्याचा मसुदा तयार केला आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.

सक्तीने, फसवणुकीने अथवा आमिष दाखवून करण्यात आलेले धर्मांतर हा गुन्हा समजून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्वरित कायदा केला जावा, अशी मागणी विशेषतः सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. हा विषय संवेदनशील असल्याने त्यासाठी महिला बालकल्याण, विधी व न्याय विभाग, अल्पसंख्यांक विकास, सामाजिक न्याय आणि गृह विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली.

देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा करण्यात आला आहे. या कायद्याचा काटेकोरपणे अभ्यास करून महाराष्ट्राच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतर विरोधात कायदा करण्याची मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली होती. या मागणीसाठी अनेक ठिकाणी जन आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. या मागणीला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. सरकार या कायद्याबाबत वेगाने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading