Friday, April 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बारामती पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्यास नकार; रोहित पवार यांनी भिरकावली कागदपत्रे

बारामती :  मुंबई पोलिसांपाठोपाठ बारामती तालुका पोलीस ठाण्यातही डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास नकार मिळाला आहे. त्यामुळे संतापलेल्या आमदार रोहित पवार यांनी कागदपत्र भिरकावून देण्याचा प्रकार घडला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या व्हीआरएस विमान कंपनीवर कारवाई करण्यास विलंब केल्याबद्दल डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी या दोघांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी काल रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात केली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार देण्यात आला.

कोणाचा तरी फोन आल्यानंतर पोलिसांकडून नकार मिळाल्याचे सांगत रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला. तसेच बारामती येथे जाऊन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यानुसार युगेंद्र आणि राजेंद्र पवार यांच्यासह रोहित पवार यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, बारामती पोलिसांनी ही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यावेळी मुंबई प्रमाणेच बारामती येथे देखील पोलीस आणि रोहित पवार यांच्याच बाचाबाची झाली. आंदोलनात सहभागी झालेले बारामतीकरही आपल्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading