आपलेपणा जोपासत व्हीजे परिवार कार्निव्हल संपन्न
पुणे : घरमालक आणि कामगारांची मुले एकाच वेळी खेळांचा, स्पर्धांचा, मनोरंजनाचा आनंद लुटतायेत आणि व्यावसायिक नात्यापलीकडील सामाजिक आपुलकी अनुभवीत आहेत असे आश्वासक चित्र नुकतेच पुण्याने अनुभविले, निमित्त होते विलास जावडेकर डेव्हलपर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हीजे परिवार कार्निव्हलचे.
ज्या बांधकाम उद्योगात बरेचदा इन्व्हेंटरी आणि केवळ व्यवहारांचीच भाषा बोलली जाते, त्या उद्योगात पुण्यातील विलास जावडेकर डेव्हलपर्स (व्हीजे) ने आपलेपणाची ही नवी परिभाषा स्थापित केले आहे, असे म्हणता येईल.
नुकत्याच शनिवार दि. १४ आणि रविवार दि. १५ फेब्रुवारी, २०२६ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी तब्बल ५,५३४ आणि दुसऱ्या दिवशी किमान ४,२५२ नागरिक उपस्थित होते. घरविक्री शिवाय पहिल्यांदाच एखाद्या बांधकाम व्यवसायिकाने अशा पद्धतीने हा मेळावा आयोजिला होता.
याविषयी अधिक माहिती देताना व्हीजे परिवाराच्या उपाध्यक्षा धनश्री शिंदे म्हणाल्या, “बांधकाम क्षेत्रात आम्ही समाजातील अनेक स्तरातील विविध उद्योगांशी निगडीत नागरिकांच्या संपर्कात येत असतो. बांधकाम कामगार वर्ग हा त्यातीलच महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे. आपल्या ग्राहकांचे महत्त्व सर्वांनाच माहिती असते मात्र कामगारांचे महत्त्व अनेकजण विसरतात. आमच्याकडे मात्र कायमच बांधकाम कामगार वर्गाला योग्य आणि चांगल्या दर्जाची वागणूक मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. व्हीजी परिवार कार्निव्हल सारख्या उपक्रमांमध्ये बांधकाम कामगार वर्गाला त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी करून घेणे हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग होता.”
या कार्निव्हलमध्ये आमच्या ग्राहाकांसोबतच आमच्या लेबर टीमने देखील मनमुराद आनंद लुटला. यामध्ये व्हीजे कन्स्ट्रक्शन लेबर टीमने व्हीजे सोसायटीतील रहिवासी संघांसोबत एक समर्पित क्रिकेटचा सामानाही खेळला. याबरोबरच कार्निव्हलमधील लाइव्ह परफोर्मन्स, फ्ली मार्केट, फूड स्टॉल सोबतच मातीकाम, मॉकटेल मेकिंग, मेक अप, सालसा नृत्य, कॉफी मेकिंग, चित्रकला, पपेट शो या सारख्या कार्यशाळांचा आणि रायफल शुटींग, रेन डान्स, धनुर्विद्या, डार्ट गेम्स, क्रेझी रोलर, व्हार्टेक्स टनेल, बुल राईड यांसारख्या खेळांचाही समावेश होता, असेही शिंदे यांनी नमूद केले. कार्निव्हलमध्ये मुंबई, नागपूर, बंगळुरू आणि हैदराबाद येथील रहिवासी देखील सहभाग झाले होते हे विशेष.
