Saturday, April 4, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

बिग बॉस मराठी सिझन ६ : घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; राखी सावंत!

“ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच… हो तीच… आता आली एंटरटेनमेंटची लहर, बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर… बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एंट्री होणार आहे. राखी सावंत घरात पूर्ण एंटरटेन्मेंटची त्सुनामी घेऊन येणार आहे! आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, नाती, गटबाजी आणि समज-अपसमज… सगळ्यावर राखीचा एकच प्रश्नचिन्ह! तिच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक सदस्याचा गेम हादरणार हे नक्की. कोणाशी मैत्री, कोणाशी वाद, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिक गोंजारायचं हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. तेव्हा महाराष्ट्राला एन्टरटेन्मेंटचा भारी डोस मिळणार आहे. पहा बिग बॉस मराठी सिझन ६ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

राखी सावंत यावर बोलताना म्हणाली, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हांला माझे वेगवेगळे costumes, माझा गेम पहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खुप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे.”

राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप!

बिग बॉस मराठी सिझन ६ पहा दररोज रात्री ८ वाजता, आपल्या लाडक्या Colors Marathi आणि JioHotstar वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading