Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

तांदूळ घोटाळ्यातील आरोपीचा न्यायालयात नेत असताना मृत्यू

 

ठाणे प्रतिनिधी

शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे आणि पाच हजार क्विंटल तांदूळ घोटाळ्यातील आरोपी हरीश उर्फ भाऊ दरोडा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना वाटेतच तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या साकडबाव केंद्रात झालेल्या दीड कोटी रुपयांच्या भात खरेदी घोटाळ्यात हरीश दरोडा हे मुख्य आरोपी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात असतानाच हरीश दरोडा यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र, त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सफल झाले नाहीत

हरी दरोडा यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर सन 2023 मध्ये शासनाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तब्बल दोन वर्ष त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. अखेर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोडा यांना शहापूर मध्येच अटक केली. अटक होण्यापूर्वी काही काळ त्यांनी मोठ्या वाजत गाजत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading