Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

स्कूल व्हॅन चालकाचा चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

ठाणे  : चार वर्षाच्या चिमुरडीला मारहाण करून तिच्यावर व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला असून त्यामुळे बदलापुरात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे.

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

ज्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीत चेंदवणकर यांनी केला. दरम्यान हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading