बाळासाहेब ठाकरे याना मिळावा भारतरत्न किताब – संजय राऊत
मुंबई : हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना भारतरत्न किताब देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत..
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर उभारण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांप्रमाणेच शिंदे गटाच्या नेत्यांनीही फलक लावले आहेत. दोन्ही गट स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची वैचारिक वारस मानत आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मध्ये विशेष लेख लिहून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
