प्रत्येक व्यक्तीची सांगण्यासारखी एक गोष्ट असते. ही गोष्ट आकार घेते अस्तित्वातून, विचारांमधून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून. अस्सल व्यक्तिमत्त्व आणि खरा स्वभाव व्यक्तीची शैली घडवतात. ‘तुमचे कर्तृत्वच तुमची शैली घडवते‘ या विश्वासावर आधारलेले टायटनचे कॅम्पेन – वेअर युअर स्टोरी, नवीन पिढीला स्वतः वास्तविक जे आहोत तेच जाणीवपूर्वक आणि शांत आत्मविश्वासाने परिधान करण्याचे आवाहन करते. दोन ऑलिम्पिक पदकांची विजेती पी.व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विक्रांत मॅसी यांनी या कॅम्पेनमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी स्वतःची ओळख अतिशय कष्टाने आणि सच्चेपणातून निर्माण केली आहे, म्हणूनच या कॅम्पेनसाठी ते योग्य चेहरे म्हणून निवडण्यात आले आहेत. त्यांच्या कहाण्या आजच्या पिढीशी जुळतात, जी पिढी दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा स्वतःची ओळख जपण्याला आणि दिखाव्यापेक्षा अर्थपूर्ण गोष्टींना अधिक महत्त्व देते. आजची तरुण पिढी दिखाव्यापेक्षा सच्चेपणाला अधिक महत्त्व देते आणि वास्तवात घडलेल्या कहाण्यांना दाद देते, या साध्या पण महत्त्वाच्या विचारातूनच ही संकल्पना आकाराला आली आहे. पी.व्ही. सिंधू आणि विक्रांत मॅसी यांच्यासह हे कॅम्पेन हाच विचार जिवंत करते. या दोघांची वैचारिक खोली, जिद्द आणि साधेपणा यांनी केलेली आधुनिक शैलीची व्याख्या केवळ वरवरचा दिखावा किंवा चकाकीपुरती मर्यादित नाही. टायटन कंपनी लिमिटेडच्या अॅनालॉग वॉचेस विभागाच्या सीएमओ श्रीमती रंजनी कृष्णस्वामी म्हणाल्या, “आम्ही नेहमीच असे मानत आलो आहोत की, घड्याळ हे केवळ एक ऍक्सेसरी नाही, तर ते तुम्ही कोण आहात आणि तुमचे व्यक्तिमत्व कशाप्रकारे घडले आहे, याची शांतपणे साक्ष देणारी ती एक खूण आहे. अशा जगात जिथे खरेपणा हीच खरी प्रेरणा बनली आहे, तिथे लोकांना आपली शैली आपल्या वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब असावी असे वाटते. पी.व्ही. सिंधू आणि विक्रांत मॅसी हे दोघेही हाच विचार अत्यंत प्रामाणिकपणे साकार करतात. त्यांच्या जीवन कहाण्या आणि आमच्या ब्रँडची मूल्ये एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत आहेत. टायटन ज्या जिद्द आणि धैर्याचे प्रतीक आहे, त्याचेच दर्शन हे दोघे घडवतात. घड्याळ निर्मितीच्या कलेत टायटनचा जो अविरत प्रवास सुरू आहे, त्या परंपरेला ते अधिक समृद्ध करतात.” पी.व्ही. सिंधू यांच्यावरील ही फिल्म ‘अविरत मेहनत आणि पोलादी निर्धार‘ यांची सांगड आहे. या फिल्ममध्ये त्यांचा लढाऊ बाणा आणि खेळाप्रती असलेले त्यांचे प्रेम अतिशय सुंदररित्या टिपले आहे. त्यांची ही ऊर्जा आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देईल; अशा पिढीला जी ‘जिद्द‘ या गुणाला स्वतःच्या अभिव्यक्तीचे माध्यम मानते आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेते. पी.व्ही. सिंधू म्हणाल्या, “या फिल्ममुळे मी बॅडमिंटन कोर्टावर आणि त्याबाहेर माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या त्या सर्व क्षणांच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून गेले. दृढनिश्चय आणि जीवनातील उद्दिष्ट यातूनच एक अनोखी शैली तयार होते, हा विश्वास हे कॅम्पेन देते. टायटनसोबतचे हा सहयोग माझ्यासाठी खूप खास ठरला, कारण या ब्रँडने माझ्या प्रवासामागील खऱ्या भावना समजून घेतल्या आणि त्या अत्यंत प्रामाणिकपणे पडद्यावर मांडल्या.” पी.व्ही. सिंधू कॅम्पेन फिल्म: https://youtu.be/pTgCCnCMb8w विक्रांत मॅसीवर आधारित फिल्म त्यांच्या एका महत्त्वाच्या विचाराचे दर्शन घडवते; ते म्हणजे— “कामाचे खरे मोजमाप त्याच्या व्यापावरून नाही, तर तुम्ही त्या कलेमध्ये किती जीव ओतता, यावरून ठरते.” त्यांचा प्रवास अशा लोकांना आपलासा वाटतो जे प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक उचलतात आणि ज्यांची ओळख त्यांच्या ‘खरेपणा‘ जपण्याच्या धैर्यामुळे निर्माण होते. विक्रांत मॅसीने सांगितले, “माझ्या प्रवासात मी नेहमीच वेगाला नाही, तर प्रामाणिकपणे जगण्याला महत्त्व देत आलो आहे. माझी शैली साधेपणा आणि निखळपणातून निर्माण झाली आहे. म्हणूनच, टायटनची ‘Wear Your Story’ ही संकल्पना मला खूप जवळची वाटते. एक घड्याळ मला मी कुठून आलो आहे आणि मला पुढे कुठे जायचे आहे, याची सदैव आठवण करून देते.” विक्रांत मॅसी कॅम्पेन फिल्म – https://youtu.be/q7LqIyJorM0 या दोन्ही फिल्म्स टायटनची विकसित होत असलेली डिझाइन शैली, आधुनिक कथाकथनाची पद्धत आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सखोलतेतून प्रेरणा घेऊन केलेली कलाकुसर यांचे दर्शन घडवतात. यात घड्याळ हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाचे एक मूक साक्षीदार म्हणून समोर येते, जे त्यांच्या वैयक्तिक शैलीला अतिशय सूक्ष्मपणे आकार देते आणि ती प्रतिबिंबित करते. ओगिल्वी साऊथचे चीफ क्रिएटिव ऑफिसर, श्री पुनीत कपूर यांनी अधिक माहिती दिली की, “ही कल्पना एका साध्या सत्यातून जन्माला आली आहे: मोठे ब्रँड्स हे लोकांचे, त्यांच्या प्रेरणेचे आणि त्यांच्या जिद्दीचे प्रतिबिंब असतात. आपण आयुष्यात जे निर्णय घेतो, ते आपल्या प्रत्येक लहान गोष्टीमध्ये दिसून येतात, अगदी आपण स्वतःला ज्या गोष्टींनी सजवतो त्यातही. भारतात अशा लाखो अस्सल कथा आहेत. आम्ही पी.व्ही. सिंधू आणि विक्रांत मॅसी यांच्यापासून सुरुवात केली आहे; महत्त्वाकांक्षा पूर्ण करताना ज्या अडीअडचणींनी त्यांना घडवले, त्या प्रवासाचा आम्ही सन्मान केला आहे. जे त्यांच्यासाठी खरे आहे, तेच आपल्यासाठीही आहे. म्हणूनच, टायटन या भारताच्या ओजी वॉच ब्रँडसोबत आणि इंजिनिअरिंगमध्ये दडलेल्या कलेच्या त्यांच्या डिझाइन तत्त्वज्ञानासह, भारतीयांचे आयुष्य आणि त्यांच्या आकांक्षांमधून प्रेरणा घेणारी कथा मांडणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” हे कॅम्पेन सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर सुरु आहे. टायटनचे प्रत्येक भारतीयाला आवाहन, स्वतःच्या संघर्षाचा सन्मान करा आणि आपली अनोखी जीवन कहाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवून आत्मविश्वासाने मिरवा. एजन्सी: निर्मिती: ओगिल्वी, बंगलोर प्रेसिडेंट आणि ऑफिस हेड, ओगिल्वी दक्षिण: तिथी घोष
Read More