टाटा एआयए ‘ऑरा’ : भारतातील विमा क्षेत्रातील पुढील पिढीचे उद्योजक घडवणारा उपक्रम
जलद बदलणाऱ्या आर्थिक परिदृश्यात विमा सल्लागारांची भूमिका आमूलाग्र बदलली आहे. आज अनेक तरुण व्यावसायिक या क्षेत्राकडे केवळ नोकरी म्हणून नव्हे, तर पूर्णवेळ उद्योजकीय संधी म्हणून पाहत आहेत. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी भारतातील जीवनविमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स उभी आहे. विमा सल्लागारांना यशस्वी उद्योजक म्हणून घडवण्यासाठी टाटा एआयए ऑरा या अभिनव प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टाटा एआयएने पुढाकार घेतला असून, नव्या पिढीतील सल्लागारांसाठी वाढ, स्वातंत्र्य आणि दीर्घकालीन करिअरची नवी दारे खुली केली आहेत.
उद्याच्या विमा सल्लागारांना सक्षम करणारा उपक्रम
भारतात 31.5 लाखांहून अधिक जीवनविमा सल्लागार कुटुंबांचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. मात्र, सातत्यपूर्ण वाढ असूनही विमा प्रवेश (इन्शुरन्स पेनिट्रेशन) अद्याप तुलनेने कमी आहे. आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) मध्ये भारताच्या जीडीपीपैकी केवळ 3.7 टक्के वाटा जीवनविम्याचा आहे. या क्षेत्रातील प्रचंड संधी ओळखून टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने टाटा एआयए ‘ऑरा’ उपक्रमाच्या माध्यमातून पुढील पिढीतील सल्लागारांना सक्षम करण्याचा संकल्प केला आहे. विशेषतः कमी सेवा मिळणाऱ्या भागांत वाढ आणि जनजागृती घडवून आणत, देशाला “2047 पर्यंत सर्वांसाठी विमा” या ध्येयाकडे नेण्यात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
टाटा एआयएचे अॅडव्हायझर डिस्ट्रीब्युशन प्रमुख अमित दवे म्हणतात, “टाटा एआयएमध्ये आम्ही आमच्या सल्लागारांना खरे उद्योजक मानतो. ते केवळ विमा विकत नाहीत—ते नाती निर्माण करतात, भवितव्य सुरक्षित करतात आणि दीर्घकालीन परिणाम घडवतात. टाटा एआयए ‘ऑरा’ त्यांना व्यवसाय वाढीसाठी आवश्यक साधने, मार्गदर्शन (मेंटॉरशिप) आणि धोरणात्मक दिशा देते, ज्यामुळे ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देत त्यांच्या यशाचा प्रवास आमच्या व्यापक उद्दिष्टांशी—भारतभर कुटुंबांचे संरक्षण—समन्वयित होतो.”
साइड गिगपासून पूर्णवेळ उद्योजकीय करिअरकडे
कधीकाळी अर्धवेळ स्वरूपात पाहिला जाणारा विमा सल्लागारांचा व्यवसाय आता मोठ्या संधी असलेला पूर्णवेळ करिअर पर्याय म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आजचे विमा सल्लागार केवळ मध्यस्थ राहिलेले नाहीत—ते स्वतःचा व्यवसाय सांभाळणारे उद्योजक आहेत. वेळेचे नियोजन, ग्राहकांशी नाती, व्यवसायवाढ आणि दीर्घकालीन धोरणे यांचे व्यवस्थापन ते स्वतंत्रपणे करतात. नाविन्यपूर्ण साधने, तज्ज्ञ मार्गदर्शन (मेंटॉरशिप) आणि मजबूत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सल्लागार अल्पावधीत आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. यामुळे एकीकडे देशाच्या आर्थिक सुरक्षिततेत योगदान मिळते, तर दुसरीकडे स्वतःचे यशही सुनिश्चित होते.
टाटा एआयए ऑरा या प्लॅटफॉर्मद्वारे सल्लागारांना डिजिटल साधने, संरचित प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी आवश्यक संसाधनांचा सर्वसमावेशक संच उपलब्ध करून दिला जातो. व्यवहारकेंद्री दृष्टिकोनापेक्षा विश्वासावर आधारित दीर्घकालीन नातेसंबंधांवर भर देत, ऑरा विमा सल्लागार म्हणजे नेमके काय—याची व्याख्याच नव्याने घडवत आहे.
विमा उद्योगासाठी मैलाचा दगड : जीवनविम्यावर 0% जीएसटी
विमा सल्लागार व्यवसायाच्या वाढीला गती देणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे जीवनविमा पॉलिसींवर
शून्य टक्के जीएसटी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय. या निर्णयामुळे ग्राहकांसाठी जीवनविमा अधिक परवडणारा झाला असून, विमा सल्लागार व्यवसायालाही नवे बळ मिळाले आहे.
जीवनविमा हा केवळ गुंतवणूक पर्याय न राहता भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यावश्यक आर्थिक संरक्षण साधन म्हणून अधिक ठळकपणे समोर येत आहे.
विमा सल्लागार क्षेत्रातील टाटा एआयएचे नेतृत्व
रिटेल सम अॅश्युअर्डमध्ये क्रमांक एक जीवनविमा कंपनी आणि आर्थिक वर्ष 2024–25 (FY25) मध्ये 99.4% दावा निकाली काढण्याचा (क्लेम सेटलमेंट) दर असलेली टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स ही कंपनी उद्योगातील विश्वासार्ह नाव म्हणून आपली ओळख अधिक बळकट करत आहे. सध्या 1.5 लाखांहून अधिक सल्लागार टाटा एआयए कुटुंबाचा भाग असून, सल्लागारांना सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या ग्राहकांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यावर कंपनीचा ठाम भर आहे.
याच वचनबद्धतेचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा उपक्रम म्हणजे टाटा एआयए ऑरा. धोरणात्मक मार्गदर्शन देण्यासाठी रचलेला हा प्लॅटफॉर्म सल्लागारांना स्वतःला व्यवसायमालक म्हणून पाहण्यास प्रोत्साहन देतो—स्वतःची उद्दिष्टे ठरवणे, दीर्घकालीन ग्राहकनाती जोपासणे आणि शाश्वत वाढ साधणे, हे या दृष्टिकोनाचे केंद्र आहे. ‘ऑरा’च्या माध्यमातून टाटा एआयए सल्लागारांना आवश्यक साधने, पाठबळ आणि दिशा पुरवते, ज्यामुळे ते आपल्या समुदायांमध्ये दीर्घकाळ परिणामकारक योगदान देऊ शकतात.
उद्योगातील मान्यता आणि भविष्यातील संधी
उत्कृष्टतेसाठीची टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स यांची वचनबद्धता उद्योगातील सातत्यपूर्ण नेतृत्वातून स्पष्ट दिसते. सलग तीन वर्षे टाटा एआयएला मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) सदस्यसंख्येच्या बाबतीत भारतात क्रमांक एक स्थान मिळाले आहे. या मान्यतेमुळे जागतिक जीवनविमा सल्लागार परिसंस्थेत अपवादात्मक कामगिरी आणि समर्पणासाठी टाटा एआयएचे सल्लागार गौरवले गेले आहेत. विविधता आणि समावेशनाला प्रोत्साहन देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे प्रतिबिंबही या यशात दिसते. 2024 मध्ये महिलांच्या MDRT सदस्यसंख्येत जागतिक स्तरावर क्रमांक चार मिळवत टाटा एआयएने समावेशक नेतृत्वाची ठाम भूमिका अधोरेखित केली आहे.
ही सर्व पारितोषिके आणि मान्यताच सांगतात की टाटा एआयएच्या पाठबळावर कार्यरत जीवनविमा सल्लागार केवळ कंपनीच्या यशात योगदान देत नाहीत—तर सहानुभूती, कौशल्य आणि कुटुंबांचे संरक्षण करण्याच्या दृढ संकल्पाने प्रेरित होऊन भारतातील आर्थिक सल्लागार क्षेत्राचे भविष्य घडवत आहेत.
पुढील पिढीतील उद्योजकांना आवाहन
विमा सल्लागार क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी संधींची क्षितिजे अमर्याद आहेत. टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे भक्कम पाठबळ आणि टाटा एआयए ऑरा या उपक्रमातून मिळणारे मार्गदर्शन यामुळे इच्छुक सल्लागारांना उद्देशपूर्ण, समाधानकारक आणि दीर्घकालीन उद्योजकीय करिअर घडवता येते. हे केवळ एक काम नाही—तर इतरांच्या आयुष्यात ठोस, सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता देणारा उद्योजकीय प्रवास आहे.
टाटा एआयएचे अॅडव्हायझर डिस्ट्रीब्युशन प्रमुख अमित दवे म्हणतात, “टाटा एआयएमध्ये आम्ही विमा क्षेत्रातील पुढील पिढीचे उद्योजक घडवण्यास कटिबद्ध आहोत—उद्देशाने सशक्त, परिणामांनी प्रेरित आणि ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या ध्येयाने प्रेरित.”
सल्लागारांप्रती टाटा एआयएची ही अढळ वचनबद्धता दर्शवते की एकत्रितपणे आपण भारतातील कोट्यवधी कुटुंबांसाठी सुरक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम भविष्य उभारू शकतो
