मुंबई: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) अनेकदा शांतपणे वाढतो, लक्षात न येता राहतो आणि गंभीर परिणाम घडवतो. पण ही परिस्थिती बदलू शकली, तर? या आजाराचा प्रतिबंध आजच आपल्या आवाक्यात असेल, तर? सर्व्हायकल कॅन्सर : टाळता येणारे संकट सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण या आजाराचे असतात. मात्र आनंदाची बाब म्हणजे, यापैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना हा आजार वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो. तरीसुद्धा, ३० ते ४९ वयोगटातील केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी महिलांनी आजपर्यंत या आजाराची तपासणी करून घेतलेली आहे (स्रोत: hpvcentre.net, cdc.gov, who.int). हे त्यांच्या उदासीनतेमुळे होत नाही, तर अनेक महिलांना योग्य माहिती, सुविधा आणि वेळेवर मदत मिळत नाही म्हणून असे होते. यावरचा उपाय सोपा आहे. प्रतिबंधासाठी आधीच एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन) ही लस घेणे, हा ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळविण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रतिबंधाची सुरुवात वेळेवर कृतीपासून होते गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याआधीच एखाद्या कुटुंबाने पावले उचलली तर काय? टाटा एआयए हेल्थ बडी कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण घेण्यास सक्षम करते. ‘हेल्थ बडी’च्या सुविधांमधून ‘एचपीव्ही’चे लसीकरण सहज उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांना ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळवता येते, तेही सवलतीच्या दरात. बाहेर वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स घेण्याचा त्रास आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. त्यांपासून टाटा एआयए सुटका करून देते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य पाऊल उचलणे कुटुंबांसाठी सोपे होते. ‘टाटा एआयए हेल्थ बडी’चा वापर ग्राहक कंपनीच्या अॅपवर करू शकतात: अॅंड्रॉईड : गूगल प्लेवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप आयओएस : अॅप स्टोअरवरवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप ‘टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स’चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसमधील मार्केटिंग विभागाचे चीफ ऑफ प्रॉडक्ट्स सुजीत कोठारे म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांना भेडसावणारा खूप मोठा धोका आहे, पण त्याचा प्रतिबंध आपल्या हातात आहे. एचपीव्ही लसीकरणासारखे सक्रिय पाऊल वेळेवर उचलल्यास आपण आगामी पिढ्यांचे संरक्षण करू शकतो. महिलांना निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने देण्यासाठी आम्ही ‘टाटा एआयए’मध्ये कटिबद्ध आहोत. आमच्या टाटा एआयए हेल्थ बडी सुविधांद्वारे आम्ही एचपीव्ही लसीकरणावर खास सवलत देत आहोत. त्यातून आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्या आरोग्यकल्याणाप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक बळकट करतो. एकत्र येऊन आपण ‘सर्व्हायकल कॅन्सर’विरुद्धच्या लढ्यात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.” फक्त लसीकरणापुरतीचच नव्हेस तर प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण साथ सर्व्हायकल कॅन्सरचा प्रतिबंध ही केवळ सुरुवात आहे. टाटा एआयए हेल्थ बडी हे अॅप कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्यप्रवासात साथ देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात पुढील सुविधा मिळतात: डॉक्टरांशी सल्लामसलत : गरज पडेल
Read More