Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

कन्नड संघाच्या वतीने कवीनमन कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी

पुणे  : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉ. डी. आर बेंद्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कन्नड संघाच्या वतीने येत्या शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी कवीनमन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एरंडवणे येथील कन्नड माध्यमाच्या डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या श्री गुंडूराज शेट्टी मेमोरियल सभागृह या ठिकाणी सायं ५ वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होणार असून त्यानंतर आनंद झुंझारवाड यांचे ‘डॉ. डी. आर बेंद्रे यांचे कवितांवरील विचार’ या विषयावर व्याख्यान होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading