Thursday, May 14, 2026
BusinessLatest News

 ३६ कोटी भारतीय ग्राहकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियम मोफत मिळणार !

 

पुणे: भारताची आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारती एअरटेलने आता आपल्या ग्राहकांसाठी खास सोय उपलब्ध करुन दिली आहे. एअरटेलने ३६ कोटी भारतीय ग्राहकांसाठी अडोबी एक्सप्रेस हे अत्याधुनिक एप आता उपलब्ध केले आहे. अडोबी एप्लिकेशन हे वापरण्यासाठी अतिशय सोप्पे आहे. शिवाय या एप्लिकेशनच्या मदतीने डिजीटल कामही जलदरित्या पूर्ण होते. त्यामुळे सोशल मिडीयाशी संबंधित कोणतेही डिजीटल काम करणे आता सहज शक्य होणार आहे.

भारती एअरटेल आणि अडोबी यांच्यात पहिल्यांदाच या विषयासंदर्भातील ऐतिहासिक करार झाला आहे. या भागीदारीतून एअरटेल आपल्या सर्व ग्राहृकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियमची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे. याद्वारे एअरटेलचे ग्राहक सोशल मिडीया पोस्ट, मार्केटिंग संबंधित डिजीटल काम, छोटे व्हिडिओ आणि इतर कोणतेही डिझाइन अत्यंत कमी श्रमात करु शकतील. या एप्लिकेशच्या मदतीने होणारी सर्व कामे उच्च दर्ज्याची असतील. या एप्लिकेशनच्या सबस्किप्शनची मूळ किंमत चार हजार रुपये आहे. मात्र एअरटेलच्या ग्राहकांसाठी  प्रीमियम सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी मोफत असेल. विविध सोयीसुविधांच्या उपलब्धतेमुळे डिझायनिंगचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या ग्राहकांनाही आपल्या कल्पकतेच्या बळावर व्यावसायिक दर्ज्याचे कंटेट तयार करता येतील.

अडोबी एक्सप्रेस प्रीमियमचे हे विशेष सबस्क्रिप्शन एअरटेलच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. मोबाईल, वाय-फाय आणि डीटीएच सेवा वापरणा-या ग्राहकांना या एप्लिकेशनचा वापर करता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त एअरटेल थँक्स एपवर लॉग-इन करुन या सर्व सोयीसुविधांला लाभ घेता येईल. हे सबस्क्रिप्शन सुरु करण्यासाठी कोणत्याही क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.

या भागीदारीबद्दल भारती एअरटेलचे कनेक्टेड होम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मार्केटिंग संचालक सिद्धार्थ शर्मा यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘अत्याधुनिक एआय साधनांच्या माध्यमातून कोट्यावधी भारतीयांना सर्जनशीलता आणि नवकल्पनांसाठी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वतःचा पहिल्यांदाच रिझ्युम बनवणारा विद्यार्थी असो वा आपल्या व्यवसायाचे पोस्टर डिझाइन करणारा छोटा उद्योजक किंवा फॉलोअर्ससाठी व्हिडिओ एडीट करणारा एखादा क्रिएटर, या एअरटेलच्या सर्व ग्राहकांना स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक साधने पुरवणे हा आमचा उद्देश आहे. अडोबी एक्सप्रेसमुळे आता जागतिक दर्ज्याची सर्जनशील साधने ही केवळ चैनीची वस्तू म्हणून मर्यादित न राहता प्रत्येक भारतीयासाठी सहज उपलब्ध होणारे वास्तव ठरत आहे.’’

अडोबीचे डिजीटल मीडिया विभागाचे अध्यक्ष डेव्हिड वाधवानी यांनाही या भागीदारीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आम्ही अडोबी एक्सप्रेस या अत्यंत सोप्या आणि अष्टपैलू एप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम करण्यास कटिबद्ध आहोत. एअरटेलसोबत भागीदारी करुन आम्ही भारतातील लाखो लोकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियमची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. या उपक्रमामुळे भारतातील गतिमान क्रिएटर इकॉनॉमीला (निर्मिती क्षेत्राला) मोठी चालना मिळेल. लोकांना आपले करिअर घडवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी उच्च दर्ज्याचे कंटेंट आता सहजरित्या तयार करता येतील.’’

अडोबी एक्सप्रेस प्रीमियम हे अडोबीची सर्वोत्तम वैशिष्ट्ये थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवते. या सबस्क्रिप्शनमध्ये हजारो प्रोफेशनल डिझाईन टेम्पलेट्सचा समावेश आहे. हे सर्व टेम्प्लेट्स भारतीय सण-उत्सव, लग्नसभारंघ आणि स्थानिक व्यवसायांचा गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बॅकग्राउंड काढणे, स्वतःच्या कल्पनेनुसार इमेज तयार करणे आणि एका क्लिकवर व्हिडिओ एडिटिंग करणे यांसारखे अत्याधुनिक एआय फीचर्स मिळतात. यामध्ये ३० हजारांहून अधिक प्रोफेशनल फॉन्ट्स, १०० जीबी क्लाउड स्टोरेज, प्रिमियम स्ट़क इमेजेस आणि ऑटो-कॅप्शन तसेच इन्संट रिझाईज यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत. तयार केलेल्या कंटेंटवर कोणताही वॉटरमार्क नसेल आणि ग्राहक आपली कामे विविध उपकरणांवरुन सहजपणे सिंक करु शकतील.

अडोबी एक्सप्रेस इंग्रजी भाषेसह हिंदी, तामिळ आणि बंगाली या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. या सोयीमुळे ग्राहकांना आता त्यांच्या मातृभाषेतही सर्व फिचर्स वापरता येतील. सणासुदीची शुभेच्छापत्रे, लग्नाची निमंत्रणे, स्थानिक दुकानांसाठी जाहिराती, व्हॉट्सअप स्टेटरचे अपडेट्स हे सर्व आता अडोबी एक्सप्रेसच्या मदतीने सामान्य माणसालाही तयार करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading