Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… तर भाजपच्या विरोधात रस्त्यावरून आंदोलन करू’

 

मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा इशारा

ठाणे: प्रतिनिधी

शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचारांचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे शिक्षण संस्थेचे सचिव तुषार आपटे यांचे बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पद रद्द न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच रस्त्यावर उतरून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी दिला.

बदलापूर येथील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केले होते. त्याचा चकमकीत मृत्यू झाला. त्याला पाठीशी घालत असल्याचा गुन्हा दाखल करून आपटे यांनाही अटक करण्यात आली. याच आपटे यांना भाजपने नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य पद दिले आहे.

भाजप आपण पांढरपेशा पक्ष असल्याचे सांगतो. मात्र, लैंगिक अत्याचारांची प्रकरणे दाबणाऱ्यांना मोठे करतो. हे अजिबात योग्य नाही. यावरून त्या पक्षाची मानसिकता कळते. ज्या काँग्रेसच्या विरोधात कायम प्रचार आणि आरोप प्रत्यारोप केले त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. सत्तेसाठी एमआयएम सारख्या पक्षाचे पाय धरण्यासही कमी केले नाही, अशी टीकाह जाधव यांनी केली. आपटे यांचे स्वीकृत नगरसेवक त्वरित रद्द न केल्यास मनसे कार्यकर्ते 13 किंवा 14 तारखेला बदलापुरात महामोर्चा काढतील, असे जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading